कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

KMC Election 2025 : महापालिकेसाठी राजकीय जोडण्यांना वेग, महायुतीच्या रडारवर कॉंग्रेसचा बडा नेता

01:17 PM May 12, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

शहर उत्तरच्या विजयाने शिंदे गटाची राजकीय ताकद वाढली

Advertisement

By : संतोष पाटील

Advertisement

कोल्हापूर : माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा विधानपरिषदेचा मतदारसंघ, मनपाच्या राजकारणात शिवसेना शिंदे आणि उबाठा गटाची किंगमेकरची धडपड, आतापर्यंतचा महापालिका निवडणुकीतील पराभव धुवून काढण्याची भाजपला असलेली संधी, नामदार हसन मुश्रीफ पर्यायाने राष्ट्रवादीची प्रतिष्ठा, काँग्रेसचे कमबॅक आदी राजकीय कंगोरे घेऊन यंदाची महापालिका निवडणूक होणार आहे.

सर्वपक्षीय नेत्यांची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत पडद्यामागे आणि उघडपणे राजकीय जोडण्या वेगावल्या आहेत. सध्या कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद असून नसल्यासारखी आहे. शिवसेना फुटीनंतर अजूनही चाचपडत आहे. सत्ता नसल्याने काँग्रेसची गाडी शांत आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट एक झाल्यास काँग्रेस आणि उबाठा शिवसेना एकसंघपणे परंतु ताकदीने मैदानात उतरलेली दिसेल.

कोणत्याही स्थितीत महाविकासची सर्व सूत्रे आमदार सतेज पाटील यांच्याच हातात असतील. काँग्रेससह मित्र पक्षातील जागा वाटपात सतेज पाटील यांचीच मोहोर असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे कॅप्टन म्हणून महायुतीच्या रडारवर सतेज पाटील हेच असतील. विधानसभा निवडणुकीनंतर विशेषत: शहर उत्तरच्या विजयाने शिंदे गटाची राजकीय ताकद वाढली आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांची महापालिकेत सत्तास्थापनेत सन्माजनक जागा मिळवण्याचे मागील पंधरा वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक कुवत कमी पडल्याने ते मागे पडत होते. आता मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने कधी नव्हे इतक्या जोमाने शिवसेना (शिंदे गट) महापालिका निवडणुकीत उतरलेला दिसेल.

लोकसभा निवडणुकीची किनार लाभली अन् गटा-तटाच्या राजकारणाचे अंतरंग बहरले तर शिवसेनेचा अपेक्षाभंग होण्यास वेळ लागणार नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेतील इतर नेते गुंतल्याने आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षीय गटबाजीचा तुलनेत कमी फटका बसेल. त्यांच्या जोडीला माजी नगरसेवक सत्यजित कदम असल्याने शिवसेना तगडे आव्हान देण्याच्या स्थितीत सध्यातरी आहे.

भाजप आघाडी शांतपणे डावपेच आखत आहे. मागील सभागृहात 14 जागांवर बाजी मारली होती. यावेळी दक्षिणेतील 28 जागांसह शहरातील उच्चभ्रू वस्तीतील प्रभागावर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. मागीलपेक्षा तिप्पट जागांवर विजय मिळवण्याचे उदिष्ट घेऊन भाजपचे शिलेदार काम करत आहेत.

पक्षशिस्त प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगात भिनली असल्याने भाजपच्या थिंकटँकचा सामना करताना महाविकास आघाडीसह अजित पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाची दमछाक होईल. नामदार हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीच्या शिलेदारांसाठी उमेदवारी घेण्यापासून संघर्ष करावा लागणार आहे.

शिवसेना आणि भाजपच्या कोट्यातून राष्ट्रवादीच्या इच्छुकांसाठी स्पेस निर्माण करण्यासाठी राजकीय अनुभव पणाला लावावा लागेल. महायुतीमध्ये मानाच्या पंगतीमध्ये बसण्यासाठी पहिल्या टप्यात हक्काच्या जागा मिळवणे आणि त्या निवडूण आणण्यासाठी मुश्रीफ यांची कसरत होईल. मात्र तगड्या उमेदवारांना संधी मिळाली तर गत सभागृहा इतके अस्तित्व राखणे शक्य होईल.

आउटगोईंग रोखण्याचे आव्हान फोडाफोडी करुन सत्ता नको, याचे पडसाद राज्यभर उमटून उलट प्रतिक्रिया येण्यापेक्षा सत्ता हेच नेत्यांचे टार्गेट आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत पक्षातंर्गत इर्षा टोकाला जाऊ शकते. सर्वच प्रभागात तुल्यबळ उमेदवार देण्याचे मोठे आव्हान सर्वपक्षीयांपुढे आहे. हे दोन्ही आघाडीत अलबेल दिसत असले तरी निवडणुकीच्या तोंडावर आऊटगोईंग रोखण्याची कसरत करावी लागणार आहे.

Advertisement
Tags :
#eknath_shinde#hasan mushrif#kolhapur municipal corporation#sthanik swarajy sanstha elections#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaSATEJ PATIL
Next Article