For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापालिकेकडून माळींना रेनकोटचे वितरण

12:40 PM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
महापालिकेकडून माळींना रेनकोटचे वितरण
Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेच्या बागायत विभागात माळी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेकडून सोमवारी रेनकोटचे वितरण करण्यात आले. महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी व सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या हस्ते महापौर कक्षात रेनकोटचे वाटप करण्यात आले. मनपा हद्दीत येणाऱ्या शहर व उपनगरांतील उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेच्या बागायत विभागात माळी म्हणून कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून विविध उद्यानांची देखभाल केली जाते. पावसाळ्यात कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय दूर व्हावी, यासाठी महापालिकेच्यावतीने कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. रेनकोट वितरणप्रसंगी महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली, श्रीशैल कांबळे, जयतीर्थ सवदत्ती आदी नगरसेवक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.