For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Municipal Council | साताऱ्यात थकबाकीदारांवर पालिकेची कारवाई; ३ गाळे सील

11:28 AM Mar 17, 2026 IST | NEETA POTDAR
satara municipal council   साताऱ्यात थकबाकीदारांवर पालिकेची कारवाई  ३ गाळे सील
Advertisement

                           सातारा नगरपालिकेची धडक मोहीम

Advertisement

सातारा - सातारा नगरपरिषदेकडून थकबाकीदारांविरोधात वसुली मोहीम सुरू असून गुरुवारी (दि.१२) मंगळवार पेठ परिसरात थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. मुख्याधिकारी विनोद जळक तसेच कर अधिकारी उमेश महादर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी थकीत पाणीपट्टी न भरलेल्या नागरिकांच्या नळ कनेक्शनवर कारवाई करत ती तोडण्यात आली.

या मोहिमेत दिनकर शिंदे (रा. ४०५, मंगळवार पेठ) यांच्याकडे १,५९,२२७ रुपये, चंद्रकांत देवी (रा. ५१३, साई विहार अपार्टमेंट, मंगळवार पेठ) यांच्याकडे ५३,५६२ रुपये, सिराज कुरेशी (रा. ५७६, मंगळवार पेठ) यांच्याकडे ७६,४९६ रुपये तसेच शिरीष सांगलीकर (रा. ३०४, मंगळवार पेठ) यांच्याकडे ३९,८४२ रुपये इतकी थकबाकी आढळून आली. त्यामुळे संबंधितांच्या नळ कनेक्शनवर कारवाई करण्यात आली.

Advertisement

या मोहिमेत भाग लिपिक राजेंद्र बाबर, संजय कोळी, तुषार माहुलकर, तेजस कांबळे, भरत चौधरी व आमन शेलार यांनी सहभाग घेतला.नगरपरिषदेकडून थकबाकीदारांनी तात्काळ थकबाकी भरावी, अन्यथा पुढील काळात अशा प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Advertisement
Tags :

.