For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंडेवाडीसह हत्तरसंग-कुडल परिसरात मुसळधार पाऊस

05:56 PM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंडेवाडीसह हत्तरसंग कुडल परिसरात मुसळधार पाऊस
Advertisement

जेऊर प्रतिनिधी  : मुंडेवाडी परिसरासह हत्तरसंग, कुडल, संगमश्री आणि संगमेश्वर मंदिर परिसरात सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या अर्ध्या तासापासून परिसरात पावसाची संततधार सुरू असून, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर काही प्रमाणात परिणाम झाला.

Advertisement

जोरदार पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर तसेच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना ये-जा करताना काळजी घ्यावी लागत आहे.

दरम्यान, या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून, खरीप पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Advertisement

पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच सखल भागातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.