‘फर्स्ट कॉपी’ सीरिजमध्ये मुनव्वर
पायरेसी जगतावर आधारित कहाणी
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीची वेबसीरिज ‘फर्स्ट कॉपी’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमधून मुनव्वर फारुकी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ही सीरिज 20 जून रोजी अमेझॉन एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.
नाव भले फर्स्ट कॉपी असले तरीही हा शो पूर्णपणे ओरिजिनल आहे. 20 जुनला भेटू केवळ एमएक्स प्लेयरवर असे मुनव्वरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे. या सीरिजची कहाणी 90 च्या दशकातील पायरेसी जगतावर आधारित आहे. त्या काळात एक सामान्य युवक पायरेसीद्वारे गरीबीतून बाहेर पडत आलिशान जीवन जगू लागतो, महागड्या कारमधून फिरू लागतो आणि पाहता पाहता मोठे प्रस्थ ठरतो. यात आरिफ नावाची भूमिका मुनव्वर साकारत आहे, आरिफ यात पायरेसीचा व्यवसाय वाढविण्यासाठी सर्वप्रकारच्या जोखीम पत्करत असतो. यात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आशी सिंह दिसून येणार आहे.
फर्स्ट कॉपी या सीरिजमध्ये मुनव्वरसोबत क्रिस्टल डिसूजा, गुलशन ग्रोव्हर, साकिब अयूब, आशी सिंह, मेयांग चांग, इनाम उल हक आणि रजा मुराद यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.