For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईच्या स्टास्या पंड्याला ज्युनियर अश्वदौड स्पर्धेत रौप्य पदक

06:41 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबईच्या स्टास्या पंड्याला ज्युनियर अश्वदौड स्पर्धेत रौप्य पदक
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

मुंबईची युवा अश्वारोहणपटू स्टास्या पंड्याने ज्युनियर राष्ट्रीय अश्वदौड स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी करत डेसेज सांघिक स्पर्धेत (चिल्ड्रन 1 गट) रौप्य पदक पटकावले.

तिने 67.463 गुण मिळवले अणि आपल्या संघाला पदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्टास्या येथेच असलेल्या अॅमॅच्युअर रायडर्स क्लबमध्ये प्रशिक्षक बोबिन त्शोरिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते आणि घोडेस्वारी करते. रौप्य पदक जिंकणाऱ्या संघात गुजरातच्या सी हॉर्स इक्वेस्ट्रियनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरिप्रिया सिंगने 71.243 व अमारा सिंगने 68.581 गुण नोंदवले. मेरठच्या मोदी इक्वेस्ट्रियनच्या सेरानो नावाच्या घोड्यावर स्वार झालेल्या देव हरीश कपूरने 65.934 गुणांची भर घातली. संघाने एकूण 207.287 गुणांसह रौप्य पदक पटकावले.

Advertisement

Advertisement
Tags :

.