महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबईच्या सायकलपटूंनी जिंकले गोव्याचे मन

12:36 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्पल फेस्तासाठी केला टँडम सायकलवरून 40 तास प्रवास

Advertisement

पणजी : बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा 2024मध्ये सहभागी होण्यासाठी, 40 तासांच्या या उल्लेखनीय प्रवासादरम्यान अंतर आणि दिव्यंगत्वावर मात करत सहा साहसी सायकलपटूंच्या गटाने तीन टॅंडम सायकलवरून मुंबई ते गोवा असा यशस्वी प्रवास केला. रविवारी सकाळी काम्पाल-पणजी येथील दयानंद बांदोडकर मैदानावर आगमन झाल्यानंतर समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद पावसकर यांनी सायकलपटूंची भेट घेतली. समाजकल्याण मंत्री फळदेसाई म्हणाले, टॅन्डम सायकलवरून प्रवास करत हे तऊण आनंदी व्यक्ती गोव्यात दाखल झाल्याचे पाहून मला खूप आनंद झाला आहे. हे खूप कठीण काम आहे. खरं तर, ही एक घटना आहे जी आधीच पूर्ण झाली आहे. ताशी 20-25 किलोमीटर या सरासरी गतीने त्यांनी हा प्रवास केला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने एका उद्दात उपक्रमात सहभागी होण्यासाठी हे तऊण गोव्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट-गोवा 2024च्या वतीने त्यांनी या सायकलस्वारांचे स्वागत केले आणि त्यांच्या पराक्रमी कामगिरीचे कौतुक केले. पर्पल फेस्टमध्ये या सायकलस्वारांचा सहभाग हा दिव्यंगत्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या आणि अडथळे-संकटांना जुमानता आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहण्याची त्यांची प्रबळ मानसिकता ही इतरांना प्रेरणा देण्याच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल, असे दिव्यांगजन आयुक्त पावसकर म्हणाले.

Advertisement

प्रत्येक प्रवास हा आमच्यासाठी विलक्षण अनुभव

प्रत्येक प्रवास हा विलक्षण अनुभव असतो. हा प्रवास म्हणजे भावना, निराशा, संघर्ष आणि अडथळे यांचा रोलर कोस्टर आहे. प्रत्येक संघर्ष मला आठवण करून देतो की प्रत्येक दिवस हा काही ना काही आव्हाने घेऊन येतो. परंतु याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला प्रत्येक समस्येचे लेबल लावावे लागेल. तुम्हाला फक्त त्यावर मात करायची आहे किंवा त्यातून बाहेर पडायचे आहे. त्यामुळे दिव्यंगत्व हे देखील फक्त एक आव्हान आहे. तुम्हाला त्याचे लेबल लावण्याची गरज नाही. दिव्यांग व्यक्तींना अक्षम असे लेबल लावणे योग्य नाही. हे एक आव्हान आहे यात शंका नाही, पण आम्हाला त्यावर मात करायची आहे, त्याला सामोरे जायचे आहे आणि आनंद घ्यायचा आहे, असे सायकलपटू नुपूर पिट्टी म्हणाल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article