महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई सय्यद मुस्ताकअली चषकाचा मानकरी

06:31 AM Dec 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अजिंक्य रहाणे ‘मालिकावीर’, सुर्यांश शेडगे ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या 2024 च्या सय्यद मुस्ताकअली टी-20 चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुंबईने मध्यप्रदेशचा 13 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी दणदणीत पराभव करत विजेतेपद मिळविले. मुंबईच्या अजिंक्य रहाणेला ‘मालिकावीर’ तर सुर्यांश शेडगेला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. कर्णधार रजत पाटीदारचे नाबाद अर्धशतक वाया गेले.

या अंतिम सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून मध्यप्रदेशला प्रथम फलंदाजी दिली. मध्यप्रदेशने 20 षटकात 8 बाद 174 धावा जमवित मुंबईला विजयासाठी 175 धावांचे आव्हान दिले. मुंबईने 17.5 षटकात 5 बाद 180 धावा जमवित सय्यद मुस्ताकअली करंडकावर आपले नाव कारले.

मध्यप्रदेशच्या डावात कर्णधार रजित पाटीदारने 40 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 81, सेनापतीने 17 चेंडूत 2 षटकारांसह 23, हरप्रितसिंगने 2 चौकारांसह 15, व्यंकटेश अय्यरने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 17, राहुल बेथमने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. मध्यप्रदेशला 12 अवांतर धावा मिळाल्या. मध्यप्रदेशच्या डावात 4 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. मध्यप्रदेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 38 धावा जमविताना 2 गडी गमविले. मध्यप्रदेशचे अर्धशतक 48 चेंडूत, शतक 89 चेंडूत, दीड शतक 112 चेंडूत नोंदविले गेले. पाटीदारने आपले अर्धशतक 28 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. मुंबईतर्फे शार्दुल ठाकुर, रॉयस्टन डायस यांनी प्रत्येकी 2 तर अंकोलेकर, दुबे आणि शेडगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईच्या डावात सुर्यकुमार यादवने 35 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 48 तर शेडगेने 15 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 36, अंकोलेकरने 6 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 16, श्रेयेस अय्यरने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16, अजिंक्य रहाणेने 30 चेंडूत 4 चौकारांसह 37 आणि श्वॉने 1 षटकारासह 10 धावा केल्या. मुंबईच्या डावात 8 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. मध्यप्रदेशतर्फे टी. सिंगने 2 तर एस. शुक्ला, व्यंकटेश अय्यर व कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: मध्यप्रदेश 20 षटकात 8 बाद 174 (रजत पाटीदार नाबाद 81, सेनापती 23, हरप्रितसिंग 15, व्यंकटेश अय्यर 17, राहुल बेथम 19, अवांतर 12, शार्दुल ठाकुर व डायस प्रत्येकी 2 बळी, अंकोलेकर, दुबे, शेडगे प्रत्येकी 1 बळी), मुंबई 17.5 षटकात 5 बाद 180 (सुर्यकुमार यादव 48, शेडगे नाबाद 36, अंकोलेकर नाबाद 16, दुबे 9, श्रेयश अय्यर 16, अजिंक्य रहाणे 37, शॉ 10, अवांतर 8, टी. सिंग 2-34, शुक्ला, व्यंकटेश अय्यर व कार्तिकेय प्रत्येकी 1 बळी)

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article