मुंबई 274 धावांनी मागे
वृत्तसंस्था / जयपूर
2025 च्या रणजी स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या इलाईट ड गटातील सामन्यात सोमवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर मुंबईचा संघ 274 धावांनी पिछाडीवर आहे.
या सामन्यात मुंबईचा पहिला डाव 254 धावांवर आटोपल्यानंतर राजस्थानने आपला पहिला डाव 6 बाद 617 धावांवर घोषित केला. दीपक हुडाने 335 चेंडूत 2 षटकार आणि 22 चौकारांसह 248 तर कार्तिक शर्माने 192 चेंडूत 3 षटकार आणि 13 चौकारांसह 139 धावा पटकाविल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 165 धावांची भागिदारी केली. सचिन यादवने 15 चौकारांसह 92, कर्णधार लोमरोरने 5 चौकारांसह 41, राठोडने 1 चौकारांसह 31 धावा केल्या. मुंबईतर्फे तुषार देशपांडे व मुलानी यांनी प्रत्येकी 2 तर जैस्वालने 1 गडी बाद केला. मुंबईने दुसऱ्या डावात बिनबाद 89 जमविल्या. जैस्वाल 8 चौकारांसह 56 तर मुशीरखान 5 चौकारांसह 32 धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव सर्वबाद 254, राजस्थान प. डाव 6 बाद 617 डाव घोषित (दीपक हुडा 248, कार्तिक शर्मा 139, सचिन यादव 92, लोमरोर 41, देशपांडे व मुलानी प्रत्येकी 2 बळी), मुंबई दु. डाव बिनबाद 89 (जैस्वाल खेळत आहे 56, मुशीरखान खेळत आहे 32)