महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई - सिंधुदुर्ग विमान वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात यावी

02:39 PM Nov 06, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची विमान वाहतूक मंत्री किंजरापू नायडूंकडे मागणी

Advertisement

मालवण । प्रतिनिधी 

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून केंद्र शासनाने घोषित केला होता. पर्यटन जिल्हा म्हणून जिल्ह्यात परुळे येथे चिपी येथे विमानतळ कार्यान्वित केले होते. काही दिवसांपूर्वी येथील मुंबई -सिंधुदुर्ग मुंबई अशी विमान वाहतूक सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे .त्यामुळे दिवाळीच्या सुट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पर्यटनाच्या व्यवसायावर परिणाम जाणवत आहे.याला अनुसरून माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याशी चर्चा करून बंद झालेली विमान सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी यासाठी विनंती केली आहे. आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणुकीनंतर महाराष्ट्र शासनाशी बोलून समन्वय घडवून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. विमान सेवा सुरळीत करण्यासाठी ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश व त्याची माहिती घेतली असून त्या संदर्भात कारवाई सुरू आहे असे केंद्रीय मंत्री किंजरापू राजमोहन नायडू यांनी फोनवर सुरेश प्रभू यांना दिली.

उडान या योजने अंतर्गत हे विमानतळ असल्यामुळे याच्या सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे .असे सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले असून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असून, सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला असल्याने या ठिकाणी विमान वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे आवश्यकच आहे. यामुळे देशभरातील पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यास मोठे सहाय्य होणार आहे . मुंबई - सिंधुदुर्ग ही विमान वाहतूक सेवा आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक असून मोठ्या प्रमाणात पर्यटक मुंबईवरून या ठिकाणी येत असल्याने ही सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे .त्याचबरोबर रत्नागिरी मध्ये होत असलेल्या विमानतळाबाबत पण चर्चा करून या संबंधात आवश्यक असणारा समन्वय साधण्याची सूचना मा. सुरेश प्रभू यांनी केंद्रीय मंत्र्याकडे केली आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article