For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mumbai Rain Update : मान्सूनपूर्व पावसामुळे मुंबईकरांना दिलासा, पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस

11:05 AM Jun 03, 2026 IST | NEETA POTDAR
mumbai rain update   मान्सूनपूर्व पावसामुळे मुंबईकरांना दिलासा  पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस
Advertisement

                              मुंबईत पावसाची दमदार एंट्री

Advertisement

मुंबई - मुंबईसह उपनगरात आज पहाटेपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले असून, अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णता आणि कमालीच्या दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.... वातावरणात अचानक छान गारवा निर्माण झाला आहे. मुंबईत यंदाचा मे महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते ... मात्र, आज अचानक ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईकरांना उन्हाच्या तीव्रतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत रविवारपासूनच वळवाच्या पावसाला सुरुवात झाली होती, पण आज बुधवारी पहाटेपासूनच शहर आणि उपनगरात मान्सूनपूर्व घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तर दुसरीकडे दादर, प्रभादेवी, लालबाग आणि कुर्ला परिसरातही पावसाची हजेरी लागली असून, कुर्ल्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. सध्या संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण कायम असून, बुधवारपासून मुंबईत वळवाच्या पावसाचा जोर काहीसा वाढेल असा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांकडूनही व्यक्त केला जात आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईत गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवत आज 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

Advertisement

मुंबईसोबतच पालघर जिल्ह्यातही आज पहाटेपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील वातावरण अतिशय आल्हाददायक झाले आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून आराम मिळाला आहेच, शिवाय शेतकऱ्यांमध्येही कमालीचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. केरळमध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात असतानाच, महाराष्ट्रातील अनेक भागांत सध्या वादळी पावसाची स्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

Advertisement
Tags :

.