महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई, पंजाब आज कामगिरी सुधारण्यास उत्सुक

06:55 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
 

वृत्तसंस्था/ मुल्लानपूर

Advertisement

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन तळाकडील संघ आज गुऊवारी येथे आमनेसामने येतील तेव्हा इंडियन प्रीमियर लीगमधील त्यांच्या अपयशी मोहिमांचे स्वरूप पालटून टाकण्यासाठी या संधीचा वापर करण्यास ते उत्सुक असतील. पंजाबची उणे 0.218 ही धावसरासरी मुंबईपेक्षा किंचित जास्त आहे. ते गुणतालिकेत मुंबई इंडियन्सच्या (उणे 0.234) वर सातव्या स्थानावर आहेत.

Advertisement

पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने गमावले आहेत आणि आपापल्या मागील सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. याचा अर्थ दोन्ही संघांवर दबाव असेल. पंजाबच्या वरच्या फळीसमोरील सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान वाढले आहे. त्यात नियमित कर्णधार धवन खांद्याच्या दुखापतीमुळे सात ते 10 दिवसांसाठी बाजूला झाला आहे.

पंजाबसाठी या मोसमातील एकमेव दिलासादायक बाब म्हणजे त्यांचे उभरते भारतीय खेळाडू शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांचे उत्तम प्रदर्शन आहे. प्रभसिमरन सिंगचा फॉर्म (सहा सामन्यांत  119 धावा) ही चिंतेची बाब आहे आणि यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माच्या बाबतीत देखील असेच म्हणता येईल. त्याने सहा सामन्यांमध्ये केवळ 106 धावा केल्या आहेत. सॅम करन (126 धावा आणि 8 बळी) आणि कागिसो रबाडा (9 बळी) या त्यांच्या परदेशी गोलंदाजांच्या जोडीस आणखी आधार मिळणे आवश्यक असून अर्शदीप सिंग (9 बळी) आणि हर्षल पटेल (7 बळी) या भारतीय जोडीला लक्ष्य करणे फलंदाजांना सोपे गेले आहे.

मुंबई इंडियन्ससाठी सातत्यपूर्ण सामूहिक प्रयत्न ही काळाची गरज आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्याविऊद्ध घरच्या मैदानावर मिळविलेल्या दोन विजयांनी त्यांची पराभवांची मालिका संपुष्टात आणली, परंतु रोहित शर्माच्या शतकानंतरही चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. याची कारणे शोधताना सुऊवात हार्दिक पंड्याचा फॉर्म आणि त्याच्या भूमिकेपासून होते. या अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीचा भार उचललेला असला, तरी त्याचा 12 हा इकोनॉमी रेट चिंताजनक आहे. जेराल्ड कोएत्झी (9 बळी) आणि आकाश मधवाल (4 बळी) यांनी एका षटकात 10 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. फलंदाजीतही पंड्या प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यामुळे रोहित आणि इशान किशनचा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा बनला आहे, तर सूर्यकुमार यादवची कामगिरी संमिश्र राहिली आहे.

संघ : पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवलिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, हार्विक देसाई, नेहल वढेरा, ल्यूक वूड.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article