'मिसिंग लिंक'जवळ झालेल्या भूस्खलनानंतर विरोधी नेत्यांनी, प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर काही महिन्यांतच त्याच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. दरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार असे वर्णन केले गेलेल्या या प्रकल्पाचे काम निकृष्ट असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
Mumbai - Pune Missing Link अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनही मुंबई - पुणे 'एक्स्प्रेस वे'वरील मिसिंग लिंक पावसासमोर कुचकामी ठरला
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जिवीतहानी तसेच वित्तहानी झाली आहे. दरडी कोसळल्याने काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यासमोर पावसाचे पाण्याचा ओघ सुरु झाल्याने तसेच मोठमोठे दगड रस्त्यात कोसळल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला गेलेला मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे चांगलाच चर्चेत आला आहे. अनेक ठिकाणी हा मार्ग नादुरुस्त झाल्यामुळे पहिल्याच पावसात हा मार्ग कुचकामी ठरल्याची चर्चा सुरु आहे.
आज मुसळधार पावसात झालेल्या भूस्खलनामुळे , नुकत्याच उद्घाटन झालेल्या ६,६९५ कोटी रुपयांच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अंशतः ठप्प झाल्यानंतर , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) यासाठी निसर्गाला जबाबदार धरले असून, या घटनेचे वर्णन "दैवी कोप" असे केले आहे. "ही कंत्राटदाराची चूक नाही; हा निसर्गाचा खेळ आहे," असे MSRDC चे उपाध्यक्ष अनिलकुमार गायकवाड म्हणाले.
भूस्खलनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि योजना तयार होत्या, परंतु त्या केवळ मर्यादित प्रमाणातच होत्या, असे महामंडळाने सांगितले.
रॉक बेल्ट जाळी
द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार या दुर्घटनेला ‘दैवी कोप’ संबोधत, एमएसआरडीसीच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले, “दगड कोसळणे रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ज्यांना आयआयटी-मुंबईने मान्यता दिली आहे. यामध्ये बोगद्यावरील डोंगरावर १५ मीटर उंचीपर्यंत रॉक बोल्टिंग जाळीचा समावेश आहे. ती अजूनही शाबूत आहे. पण खाली पडणारे दगड सुमारे १५० मीटर उंचीवरून येत आहेत. असा मुसळधार पाऊस हा दैवी कोपासारखाच आहे आणि तो रोखण्यासाठी फार काही करता येत नाही.”

मिसिंग लिंक
सध्या सुरु असणारा असणारा पाऊस पाहता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणारा हा मार्ग अतिवृष्टीसमोर आपली किमया दाखवू शकला नाही. या प्रकल्पामध्ये दोन रुंद बोगदे, उन्नत उड्डाणपूल आणि टायगर व्हॅलीवरील एक केबल-स्टेड पूल यांचा समावेश आहे, जे सर्व वाहतूक अधिक सुरळीत आणि वेग स्थिर ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. तीव्र वळणे काढून टाकल्याने आणि अतिवृष्टीच्या क्षेत्रांमधील धोका कमी केल्याने, हा नवीन मार्ग एकूण सुरक्षितता वाढली असल्याच्या चर्चा या मार्गाबद्दल सुरुवातीच्या काळात झाल्या. मात्र आता या मार्गाबद्दल नकारात्मक चर्चांना सुरुवात झाली आहे.
वर्षानुवर्षे, या मार्गावरील बोरघाटचा पट्टा वाहनचालकांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरला होता. अरुंद भाग, तीव्र वळणे, तीव्र चढाव आणि अनिश्चित हवामानामुळे अनेकदा मोठा वाहतूक खोळंबा होण्याच्या अनेक घटना या मार्गाने प्रवास करणाऱ्यांनी अनुभवल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांनी स्वत: केले होते उद्धाटन
'मिसिंग लिंक' हा प्रकल्प खोपोली आणि कुसगाव दरम्यान एक पर्यायी मार्ग तयार करून या समस्येवर तोडगा काढणारा आहे अशीच चर्चा या प्रकल्पाबद्दल सुरुवातीला होती. या प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचंड विश्वास व्यक्त केला होता. मिसिंग लिंकवर स्वत: ड्रायव्हिंग करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धाटन केले होते.
एम.एस.आर.डी.सी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयआयटी मुंबईने प्रमाणित केलेल्या सविस्तर अभ्यासानंतर, बोगद्यावरील उतार रॉक बोल्ट, स्टील मेश आणि इतर भूस्खलन प्रतिबंधक उपायांचा वापर करून स्थिर करण्यात आला आहे.
The Missing Link is now Maharashtra’s New Connecting Link 🛣️
A drive through the Mumbai–Pune ‘Connecting Link', accelerating Maharashtra towards a new QUANTUM CORRIDOR...@mieknathshinde @SunetraA_Pawar #Maharashtra #MissingLinkProject pic.twitter.com/gIr2Gb0jAp— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2026
विरोधकांच्या टीका