For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chandgad News | कौटुंबिक वादानंतर नागरदळे येथे धक्कादायक घटना; परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडत पोलीस जवानाची आत्महत्या

03:19 PM Jun 17, 2026 IST | NEETA POTDAR
chandgad news   कौटुंबिक वादानंतर नागरदळे येथे धक्कादायक घटना  परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडत पोलीस जवानाची आत्महत्या
Advertisement

कोवाड -नागरदळे येथे मंगळवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले आणि यापूर्वी तब्बल १७ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावलेले दयानंद कृष्णा पाटील (बय ४२) यांनी स्वतःच्या डबल बॅरल बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्याकेल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद पाटील हे मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात पोलीस दलात कार्यरत होते. काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. हा बाद मिटविण्यासाठी मंगळवारी दुपारी नागरदळे गावाबाहेरील नागनाथ मंदिर परिसरात दोन्ही कुटुंबीय, पत्नीच्या माहेरच्या अतिवाड (जि. बेळगाव) येथील नातेवाईक तसेच दोन्ही गावांतील पंचमंडळींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीत सविस्तर चर्चा होऊन दोघांमधील मतभेद मिटल्याचे समोर आले. त्यानंतर आनंदाच्या भरात दयानंद पाटील यांनी आपल्या जवळील परवानाधारक बंदुकीतून दोन फायर हवेत केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ते आपल्या चारचाकी वाहनाने थेट घरी परतले.मात्र, हवेत केलेल्या गोळीबारामुळे पत्नीच्या माहेरच्या मंडळींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी तातडीने '११२" आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नागरदळे येथील पोलीस पाटील यांना दयानंद पाटील यांच्या घरी जाऊन बंदुकीसंदर्भातील माहिती घेण्याच्या सचना दिल्या

Advertisement

पोलीस पाटील यांनी बंदुकीच्या कागदपत्रांची चौकशी केली असता, कागदपत्रे दाखवतो, असे सांगूनदयानंद पाटील घरात गेले. काहीक्षणांतच त्यांनी घरातील लाकडीखुर्चीवर बसून बंदूक हनुवटीजवळलावत स्वतःवर गोळी झाडली. गोळीआरपार गेल्याने मोठा रक्तस्रावहोऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे तसेच पोलीस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चंदगड पोलीस ठाण्यात या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.दयानंद पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. सैन्य आणि पोलीससेवेत उल्लेखनीय योगदान देणारया एका जवानाचा अशा दुर्दैवी पद्धतीने झालेला अंत अनेकांना चटका लावून गेला. नागरदळे गावासह संपूर्ण सीमाभागातून हळहळ व्यक्त होत आहे. सैन्यातून पोलीस सेवेत... आणि अचानक पडदा दयानंद पाटील यांनी तब्बल १७ वर्षे भारतीयसैन्यात सेवा बजावली होती.

निवृत्तीनंतर त्यांनीमुंबई पोलीस दलात प्रवेश करूनकर्तव्य बजावले. शिस्तप्रिय आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांची ओळख होती. मात्र, मंगळवारी घडलेल्या या अनपेक्षित घटनेने कुटुंबीयांसहसहकारी आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement
Tags :

.