For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई बातम्या एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी आणखी चौघे गजाआड

06:45 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबई बातम्या  एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी आणखी चौघे गजाआड
Advertisement

साजिद संदे, विजय किंगरसह दोन मध्यस्थ जाळ्यात : आरोपींची संख्या 11 वर

Advertisement

मुंबई  / प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मोठी कारवाई करत आणखी चौघांना अटक केली आहे. यामध्ये दोन उमेदवार आणि दोन मध्यस्थांचा समावेश असून, या नव्या अटकसत्रामुळे प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

Advertisement

गुन्हे शाखेने साजिद संदे याला सांगली येथून, तर विजय किंगर याला बुलढाणा येथून अटक केली. या दोघांना कथित प्रश्नसंच मिळवून देण्यास मदत करणारे संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांना नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले. प्रश्नपत्रिका फुटीच्या साखळीतील या चौघांची भूमिका तपासण्यासाठी त्यांची चौकशी सुरू आहे.

गोपनीय कक्षातून प्रश्नसंच बाहेर काढल्याचा संशय

गुन्हे शाखेच्या तपासानुसार, एमपीएससीच्या गोपनीय कक्षातून तज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचाच्या प्रती अनधिकृतरीत्या बाहेर काढून आर्थिक फायद्यासाठी संबंधित उमेदवारांपर्यंत पोहोचविल्याचा संशय आहे. या प्रकरणात यापूर्वी एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे, कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील, मध्यस्थ अमफत पाटील, लोकेश ऊर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

22 मार्चला झाली होती परीक्षा

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट -ब पदांच्या 154 जागांसाठी 22 मार्च 2026 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील सहा विभागीय पेंद्रांवर झालेल्या या परीक्षेतील प्रश्नसंच परीक्षा होण्यापूर्वीच काही व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.