For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Whats AppHacked | कुरिअरच्या नावाखाली फोन अन् मुंबई महापालिका आयुक्तांचे WhatsApp हॅक!

04:13 PM Aug 26, 2026 IST | NEETA POTDAR
whats apphacked   कुरिअरच्या नावाखाली फोन अन् मुंबई महापालिका आयुक्तांचे whatsapp हॅक
Advertisement

मुंबई -मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे व्हॉट्सअॅप खाते सायबर ठगांनी हॅक केल्याची घटना समोर आली आहे. कुरिअरच्या नावाखाली फोन करून सायबर ठगांनी त्यांच्या मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंग सक्रिय केले.
भिडे यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपण कुरिअर घेऊन आलो असल्याचे संबंधिताने सांगितले.

Advertisement

मात्र, भिडे यांनी कोणतेही पार्सल मागवले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ठगांनी त्यांना एका क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले. या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंग सुरू करण्यात आले. व्हॉट्सअॅपकडूनअनेकांना पैशांची मागणी करणारे संदेशपाठवण्यात येणारा व्हेरिफिकेशन कोड एसएमएसऐवजी व्हॉइस कॉ लच्या माध्यमातून मिळविण्याचा पर्याय आरोपींनी निवडला. खाते ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी मिडे यांच्या व्हॉट्सअॅप संपर्क यादीतील व्यक्तींना संदेश पाठवून पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.