महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई, मॅनेजमेंट, कोल्हापूर, सावंतवाडी, पुणे, म्हापसा, बेळगाव उपांत्यपूर्व फेरीत

10:21 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकमान्य चषक क्रिकेट : पंकज, तन्वीर, सचिन, प्रणिल, हर्षल, जयेश यांना सामनावीर पुरस्कार : आज होणार अंतिम सामना

Advertisement

बेळगाव : लोकमान्य को-ऑप. सोसायटी व तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 11 व्या लोकमान्य चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून तरुण भारत बेळगाव, पुणे, सावंतवाडी, मुंबई, म्हापसा संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या लोकमान्य चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात तरुण भारत बेळगावने मडगावचा 7 गड्यांनी पराभव केला. मडगावने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 70 धावा केल्या. त्याला उत्तर देताना तरुण भारतने 6.2 षटकात 3 गडी बाद 71 धावा करून सामना जिंकला. तन्वीर बेळगाव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 82 धावा केल्या. त्याला उत्तर देताना रत्नागिरी-सांगली संघाने 8 षटकात 6 गडी बाद 40 धावाच केल्या. हा सामना पुणेने 42 धावांनी जिंकला. सचिन जोडवे पुणे याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात सावंतवाडीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 2 गडी बाद 136 धावांचा डोंगर रचला. त्याला उत्तर देताना कार्पोरेट संघाने 8 षटकात 6 गडी बाद 62 धावाच केल्या. हा सामना सावंतवाडीने 74 धावांनी जिंकला.  आक्रमक फलंदाजी करणाऱ्या पंकज परब याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. चौथ्या सामन्यात कोल्हापूरने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 65 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मुंबईने 7 षटकात 6 गडी बाद 66 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. प्रणील मुंबई यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पाचव्या सामन्यात तरुण भारत बेळगावने 8 षटकात 2 गडी बाद 123 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मॅनेजमेंट संघाने 8 षटकांत 1 गडी बाद 68 धावाच केल्या. हा सामना बेळगावने 56 धावांनी जिंकला. हर्षल बेळगाव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सहाव्या सामन्यात म्हापसा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 6 गडी बाद 106 धावा केल्या. त्याला उत्तर देताना पुणे संघाने 8 षटकांत 2 गडी बाद 51 धावाच केल्या. हा सामना म्हापसाने 55 धावांनी जिंकला. जयेश म्हापसा याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सोमवारचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने 1. मुंबई वि. मॅनेजमेंट यांच्यात सकाळी 8 वाजता खेळविण्यात येणार असून दोन्ही संघांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन कमिटीने केले आहे. 2. कोल्हापूर वि. तरुण भारत बेळगाव यांच्यात, 3. सावंतवाडी वि. पुणे, 4. बेळगाव वि. म्हापसा यांच्यात खेळविण्यात येणार आहे. त्यानंतर उपांत्य व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article