For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबईची बडोदावर 57 धावांची आघाडी

06:37 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबईची बडोदावर 57 धावांची आघाडी
Advertisement

शाश्वत रावत, सोळंकी यांची शतके, मुलानीचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

रणजी करंडक उपांत्यपूर्व लढतीतील सामन्यात शाश्वत रावत व कर्णधार विष्णू सोळंकी यांनी शानदार शतके नोंदवत मुंबई 384 धावांना चोख प्रत्युत्तर देताना बडोदा संघाने सर्व बाद 348 धावा जमविल्या. दिवसअखेर मुंबईने दुसऱ्या डावात 1 बाद 21 धावा जमवित बडोदावर एकूण 57 धावांची आघाडी घेतली आहे.

Advertisement

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबईच्या गोलंदाजांना बळी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. रावत व सोळंकी यांनी वैयक्तिक शतके झळकवताना तिसऱ्या गड्यासाठी 174 धावांची भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या सत्रात मुंबईला यश मिळू दिले नाही. रावतने 194 चेंडूत 15 चौकारांसह 124 तर सोळंकीने 291 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 136 धावा जमविल्या. या दोघांनी मुंबईला पहिल्या डावात फार मोठी आघाडी मिळणार नाही, याची दक्षता घेतली. मात्र सामना अनिर्णीत राहिल्यास पहिल्या डावात मुंबईला मिळालेली 36 धावांची आघाडी पुरेशी ठरणार आहे. दोघे बाद झाल्यानंतर बडोदाचा इतर फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही आणि त्यांचा डाव 348 धावांत आटोपला. मुंबईच्या शम्स मुलानीने 121 धावांत 4, तुषार देशपांडेने 52 धावांत 2 व तनुष कोटियनने 49 धावांत 2 बळी मिळविले. देशपांडेने दोन्ही शतकवीरांना बाद केले. मुंबईने दुसऱ्या डावात 12 षटकांत 1 बाद 21 धावा जमविल्या असून भूपेन लालवाणी 6 धावांवर बाद झाला. हार्दिक तमोरे 12 व नाईट वॉचमन मोहित अवस्थी 3 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : मुंबई प.डाव 384, दु.डाव 1 बाद 21, बडोदा प.डाव 348 : शाश्वत रावत 124, विष्णू सोळंकी 136, मुलानी 4-121.

Advertisement
Tags :

.