महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई इंडियन्सचा आरसीबीवर विजय

06:36 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या नवव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा (आरसीबी) 29 चेंडू बाकी ठेवून सात गड्यांनी दणदणीत पराभव केला.

Advertisement

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी दिली. आरसीबीने 20 षटकात 6 बाद 131 धावा जमवल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 15.1 षटकात 3 बाद 133 धावा जमवत आपला विजय आरामात नोंदवला. नॅट स्किव्हेर ब्रंटला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

आरसीबीच्या डावामध्ये इलेसी पेरीने एकाकी लढत देत 38 चेंडूत 5 चौकारांसह 44 तर जॉर्जिया वेरहॅमने 20 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावा जमवल्या. मोलीन्युक्सने 14 चेंडूत 1 चौकारांसह 12, मेघनाने 12 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा केल्या. सलामीची स्मृती मानधना 1 चौकारासह 9 धावावर बाद झाली. डिव्हेनीने 1 चौकारासह 9 धावा जमवल्या. मुंबई इंडियन्सतर्फे नॅट स्किव्हेर ब्रंटने 27 धावात 2 तर पूजा वस्त्रकरने 14 धावात 2 तसेच वाँग आणि इशाकी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आरसीबीला अवांतराच्या रुपात 5 धावा मिळाल्या. त्यांच्या डावामध्ये 14 चौकार नेंदवले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना यास्तिका भाटीया आणि मॅथ्यूज यांनी 23 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली. डिव्हेनीने भाटीयाला चौथ्या षटकात घोषकरवी झेलबाद केले. तिने 15 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 31 धावा जमवल्या. मॅथ्यूजने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावा केल्या. श्रेयांका पाटीलने मॅथ्यूजला झेलबाद केले. कर्णधार नॅट स्किव्हेर ब्रंट आणि अॅमेलिया केर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. आरसीबीच्या वेरहॅमने ब्रंटला झेलबाद केले. तिने 25 चेंडूत 4 चौकारासह 27 धावा जमवल्या. ब्रंट बाद झाली त्यावेळी मुंबईला विजयासाठी 15 धावांची जरुरी होती. अॅमेलिया केर आणि पूजा वस्त्रकर यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. केरने 24 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 40 तर वस्त्रकरने 1 चौकारासह नाबाद 8 धावा जमवल्या. मुंबई इंडियन्सच्या डावात 3 षटकार आणि 19 चौकार नोंदवले गेले. आरसीबीतर्फे डिव्हेनी वेरहॅम आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकात 6 बाद 131 (इलेसी पेरी नाबाद 44, वेरहॅम 27, मॉलीन्युक्स 12, मेघना 11, मानधना 9, घोष 7, नॅट स्किव्हेर ब्रंट 2-27, वस्त्रकर 2-14, वाँग 1-20, इशाकी 1-9), मुंबई इंडियन्स 15.1 षटकात 3 बाद 133 (यास्तिका भाटीया 31, मॅथ्यूज 26, नॅट स्किव्हेर ब्रंट 27, अॅमेलिया केर नाबाद 40, वस्त्रकर नाबाद 8, अवांतर 1, डिव्हेनी, पाटील, वेरहॅम प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article