महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई इंडियन्सचा गुजरातवर दमदार विजय

06:55 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर हरमनप्रित कौरची कप्तानी खेळी, गुजरात जायंट्सचा सात गड्यांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रित कौरच्या नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा एक चेंडू बाकी ठेवून सात गड्यांनी पराभव केला. हरमनप्रित कौरने 48 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 95 धावा झोडपल्या. गुजरात जायंट्सच्या कर्णधार मुनी आणि हेमलता यांची अर्धशतके वाया गेली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजी दिली. गुजरात जायंट्सने 20 षटकात 7 बाद 190 धावा जमवित मुंबई इंडियन्सला 191 धावांचे तगडे आव्हान दिले. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 19.5 षटकात 3 बाद 191 धावा जमवित शानदार विजय नोंदवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्स स्पर्धेच्या गुणतक्त्यात 10 गुणासह पहिले स्थान मिळविले आहे. दिल्ली कॅपिटल्स 8 गुणासह दुसऱ्या तर आरसीबी 6 गुणासह तिसऱ्या तसेच युपी वॉरियर 6 गुणासह चौथ्या आणि गुजरात जायंट्स 2 गुणासह शेवटच्या स्थानावर आहे. गुजरात जायंट्सचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव आहे.

गुजरात जायंट्सच्या डावामध्ये कर्णधार मुनीने 35 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारासह 66 तर हेमलताने 40 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकाकारासह 74 धावा झोडपल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 120 धावांची शतकी भागीदारी केली. भारती फुलमलने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 21 धावा जमवल्या. गुजरात जायंट्सच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. गुजरात जायंट्सच्या डावात 6 षटकार आणि 22 चौकार नोंदवले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे इशाकीने 2 तर मॅथ्यूज, शबनीम इस्माईल, पूजा वस्त्रकर आणि संजना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सच्या डावाला यास्तिका भाटीया आणि मॅथ्यूज यांनी सावध सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 39 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली. गुजरात जायंट्सच्या कंवरने मॅथ्यूजला राणाकरवी झेलबाद केले. तिने 21 चेंडूत 4 चौकारासह 18 धावा जमवल्या. यानंतर शबनमने मुंबईला आणखी एक धक्का देताना नॅट स्किव्हेर ब्रंटला दोन धावावर झेलबाद केले. गार्डनरने यास्तिका भाटीयाला स्वत:च्या गोलंदाजीवर टिपले. तिने 36 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 49 धावा जमवल्या. मुंबई इंडियन्सची यावेळी स्थिती 13.3 षटकात 3 बाद 98 अशी होती.

हरमनप्रित कौरने कप्तानी खेळी करत आपल्या संघाला केवळ एक चेंडू बाकी ठेवून थरारक विजय मिळवून दिला. मुंबईला शेवटच्या दोन षटकामध्ये 28 धावांची जरुरी होती. हरमनप्रित कौरने स्नेह राणाच्या एका षटकात 15 धावा घेतल्याने शेवटच्या षटकामध्ये मुंबईला 13 धावांची गरज होती. गार्डनरकडे हे शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हरमनप्रित कौरने षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार तर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. चौथ्या चेंडूवर अॅमेलिया केरने एक धाव घेत हरमनप्रितला विजयी धाव घेण्याची संधी दिली. हरमनप्रितने पाचव्या चेंडूवर एक धाव घेत आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. अॅमेलिया केरने 10 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 12 धावा जमवल्dया. मुंबईला अवांतराच्या रुपात 15 धावा मिळाल्या. मुंबईच्या डावामध्ये 7 षटकार आणि 22 चौकार नोंदवले गेले. मुंबईने पहिल्या पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 50 धावा जमवल्या. त्यांचे अर्धशतक 33 चेंडूत, शतक 84 चेंडूत तर दीडशतक 105 चेंडूत फलकावर लागले. गुजराततर्फे गार्डनर, तनुजा कंवर, शबनम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स 20 षटकात 7 बाद 190 (मुनी 66, हेमलता 74, फुलमल नाबाद 21, वुलव्हर्ट 13, अवांतर 4, इशाकी 2-31, मॅथ्यूज, इस्माईल, वस्त्रकर, संजना प्रत्येकी एक बळी), मुंबई इंडियन्स 19.5 षटकात 3 बाद 191 (यास्तिका भाटीया 49, नॅट स्किव्हेर ब्रंट 2, मॅथ्यूज 18, हरमनप्रित कौर नाबाद 95, अॅमेलिया केर नाबाद 12, अवांतर 15, गार्डनर, कंवर आणि शबनम प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article