For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई इंडियन्सचा ‘100’ नंबरी विजय

06:10 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबई इंडियन्सचा ‘100’ नंबरी विजय
Advertisement

राजस्थान रॉयल्स पराभूत, रोहित, रिकेल्टन यांची अर्धशतके, कर्ण शर्मा व बोल्ट यांचे प्रत्येकी 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/जयपूर

रोहित शर्मा आणि रेयान रिकेल्टन यांची अर्धशतके आणि कर्ण शर्मा व  जोरावर गुरुवारी येथे झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील 50 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी मोठा पराभव केला. या स्पर्धेतील मुंबई इंडियन्सने आपला सलग सहावा विजय नोंदवित स्पर्धेच्या गुणतक्त्यात 14 गुणासह अग्रस्थानावर झेप घेतली आहे. वैभव सूर्यवंशी आणि जैस्वाल या सलामीच्या जोडीने निराशा केल्यानंतर राजस्थान रॉयल्सला डाव सावरता आला नाही.

Advertisement

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. रिकेल्टन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने पहिल्या षटकापासूनच धावांची गती चांगली राखत फटकेबाजी केली. या जोडीने 71 चेंडूत 116 धावांची शतकी भागिदारी केली. या जोडीने पॉवरप्लेच्या 6 षटकात 58 धावा झोडपल्या. मुंबई इंडियन्सचे अर्धशतक केवळ 32 चेंडूत फलकावर लागले. रिकेल्टनने 29 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. मुंबई इंडियन्सचे शतक 61 चेंडूत नोंदविले गेले. रोहित शर्माने 31 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. डावातील 12 व्या षटकात राजस्थानच्या थीक्षानाने रिकेल्टनचा त्रिफळा उडविला. त्याने 38 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 61 धावा झोडपल्या. यानंतर रोहित शर्मा परागच्या गोलंदाजीवर जैस्वालकरवी झेलबाद झाला. त्याने 36 चेंडूत 9 चौकारांसह 53 धावा जमविल्या. मुंबईची स्थिती यावेळी 12.4 षटकात 2 बाद 123 अशी होती.

अभेद्य 94 धावांची भागिदारी

सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी 44 चेंडूत तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 94 धावांची भागिदारी केल्याने मुंबई इंडियन्सला 20 षटकात 2 बाद 217 धावांपर्यंत मजल मारता आली. या जोडीने 25 चेंडूत अर्धशतकी भागिदारी नोंदविली. मुंबईचे दीडशतक 91 चेंडूत तर द्विशतक 110 चेंडूत फलकावर लागले. सूर्यकुमार यादवने 23 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 48 तर हार्दीक पंड्याने 23 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 48 धावा झोडपल्या. मुंबई इंडियन्सच्या डावात 7 षटकार आणि 26 चौकार नोंदविले गेले. राजस्थान रॉयल्सतर्फे महेश थीक्षाना आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे.

प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थान रॉयल्सचा डाव 16.1 षटकात 117 धावांत आटोपला. सलामीचा फलंदाज आणि बलाढ्या गुजरातविरुद्ध जलद शतक झळकविणारा बिहारचा डावखुरा आक्रमक वैभव सूर्यवंशी पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाल्याने त्याचे चाहते नाराज झाले. दीपक चहरने त्याला जॅक्सकरवी झेलबाद केले. राजस्थानचा अनुभवी सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल बोल्टच्या यॉर्करवर त्रिफळाचीत झाला. त्याने 6 चेंडूत 2 षटकारासह 13 धावा जमविल्या. राजस्थानची यावेळी स्थिती 2 बाद 18 अशी होती. यानंतर राजस्थानचा डाव त्यांच्या कोणत्याही फलंदाजाला सावरता आला नाही. जोफ्रा अर्चरने 27 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 30 धावा तर शुभम दुबेने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. कर्णधार रियान परागने 3 चौकारांसह 16 तर ज्युरेलने 1 षटकारासह 11 धावा जमविल्या. राजस्थानचा डाव 16.1 षटकात 117 धावांत आटोपल्याने मुंबईने हा सामना 100 धावांनी जिंकला. मुंबईतर्फे कर्ण शर्माने 23 धावांत 3 तर बोल्टने 28 धावांत 3, बुमराहने 15 धावांत 2 तर हार्दीक पंड्या आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. राजस्थानच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदविल गेले. राजस्थानने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 62 धावांत 5 गडी गमविले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकात 2 बाद 217 (रिकेल्टन 61, रोहित शर्मा 53, सूर्यकुमार यादव नाबाद 48, हार्दीक पंड्या नाबाद 48, अवांतर 7, महेश थीक्षाना व रियान पराग प्रत्येकी 1 बळी), राजस्थान रॉयल्स 16.1 षटकात सर्व बाद 117 (आर्चर 30, दुबे 15, पराग 16, ज्युरेल 11, जैस्वाल 13, सूर्यवंशी 0, अवांतर 15, बोल्ट 3-28, कर्ण शर्मा 3-23, बुमराह 2-15, चहर 1-13, हार्दीक पंड्या 1-2)

Advertisement
Tags :

.