For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाप्पाच्या आगमनाआधी मुंबईत पावसाची ‘एन्ट्री’; खरेदीसाठी मुंबईकरांची तारांबळ

04:11 PM Sep 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाप्पाच्या आगमनाआधी मुंबईत पावसाची ‘एन्ट्री’  खरेदीसाठी मुंबईकरांची तारांबळ
Advertisement

मुंबई : मुंबईच्या अनेक भागांत मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी बरसत असून, काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आज मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास गणेशोत्सवाच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडू शकते.

काल रात्रीपासून मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला असून, शहरातील विविध भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.