For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई-गोवा महामार्ग येत्या सप्टेंबरपासून खुला

11:55 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंबई गोवा महामार्ग येत्या सप्टेंबरपासून खुला
Advertisement

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Advertisement

पणजी : गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग सप्टेंबर 2024 पासून वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ‘ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे’ असे नाव त्या महामार्गास देण्यात आले असून तो मुंबईसह रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, गोवा राज्यात जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांना जोडणाऱ्या एनएच-66 या महामार्गाचा भाग असून तो पनवेलपासून सुरू होतो. गोव्यातील राजधानी पणजीमधून तो केरळमधील कन्याकुमारीपर्यंत जातो. या महामार्गाची अंतिम तारीख न्यायालयाने देखील सरकारला विचारली होती. तेव्हा राज्य सरकारने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तो 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2024 मध्ये महमार्गाचे काम पूर्ण होईल आणि तो चाकरमान्यांसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्ग ते गोवा असा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर रस्ता या महामार्गात तयार करण्यात येणार असून संपूर्ण कामे 31 डिसेंबर 2024 पूर्वी संपवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यंदा गणेश चतुर्थीला मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करायला मिळेल, असा दिलासा जनतेला मिळाला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.