कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Mumbai Goa Highway : कसबा-शास्त्री पुलाजवळील धोकादायक दरड कोसळली

10:31 AM Apr 27, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्री पूल येथे वाहनांच्या दुतर्फा लांबच-लांब रांगा लागल्या

Advertisement

संगमेश्वर : संगमेश्वरनजीकच्या कसबा-शास्त्री पूल येथील धोकादायक दरड शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास कोसळली. यात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी 2 महिलांना किरकोळ दुखापत झाली असून एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले. या बाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार निवेदने देऊनही संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Advertisement

दरड कोसळल्यानंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्री पूल येथे वाहनांच्या दुतर्फा लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. छोटी वाहने असुर्डे-संगमेश्वर बाजारपेठ मार्गे वळवल्याने संगमेश्वर बाजारपेठेतही मोठी वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली. ग्रामस्थांनी या दरडीच्या संभाव्य धोक्याविषयी पूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, चौपदरीकरणाच्या कामात डोंगर कापण्याच्या प्रक्रियेत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

यामुळे अशा अपघातासारख्या घटनांना निमंत्रण मिळते, असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. चौपदरीकरणाचे काम धोकादायक अवस्थेत सुरू असून महामार्गावर दरड खोदकाम करताना दरडी तशाच ठेवल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. शास्त्रीपूल येथे अचानक कोसळलेल्या दरडीमुळे जीवितहानी झाली नसली तरी चौपदरीकरणाचे काम करत असताना पुरेशी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Advertisement
Tags :
#crimenewas#mumbai -goa highway#sangmeshwarnews#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaaccidnet
Next Article