For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mumbai-Goa Highway: CNG चा तुटवडा, कार उभी केली अन्... प्रवीणवर काळाचा घाला

12:13 PM May 14, 2025 IST | Snehal Patil
mumbai goa highway  cng चा तुटवडा  कार उभी केली अन्    प्रवीणवर काळाचा घाला
Advertisement

अपघातामुळे काही काळ वाहतूक थबकली.

Advertisement

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजीक रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत प्रवीण पांडुरंग साळवी (47, रा. हनुमाननगर, गुणदे-खेड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री 10.25 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात नीरज ईश्वरदिन वर्मा (29) हा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक थबकली.

प्रवीण साळवी हे लोटे येथील एच. पी. पेट्रोलपंप ते लोटेमाळ जाणाऱ्या सर्व्हिस रोडने लोटे बाजूने पायी जात होते. याचवेळी नीरज वर्मा हा एम.एच.08/.झेड. 8760 क्रमांकाच्या दुचाकीने वेगाने जात होता. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता.

Advertisement

रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत बेदकारपणे दुचाकी चालवून पादचाऱ्याला पाठीमागून धडक दिली. या अपघातात प्रवीण साळवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच चिपळूण वाहतूक पोलीस मदतकेंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामपूरकर, पोलीस कॉन्स्टेबल राठोड, नार्वेकर, निवडुंगे, लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील व सहकारी घटनास्थळी पोहचले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास लवेल येथील घरडा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार नीरज वर्मा याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

..अन् नियतीने तरुणावर झडप घातली

प्रवीण साळवी हे लोटे येथील पेट्रोलपंपावर कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी गेले होते. सीएनजीच्या तुटवड्यामुळे ते कार तिथेच उभी करून नजीकच्या टपरीवर गेले होते. परतत असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक देत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाच्या कर्त्याकरवित्यावरच नियतीने झडप घातल्याने साळवी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

Advertisement
Tags :

.