For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mumbai Crime एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आमिष दाखवित फसवणूक करणाऱ्या सराईत ठकाला अटक

07:18 PM Jun 22, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
mumbai crime एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आमिष दाखवित फसवणूक करणाऱ्या सराईत ठकाला अटक
Advertisement

मुंबई दि. 22 प्रतिनिधी
नामांकित कॉलेजमध्ये एमबीबीएसला प्रवेश देण्याचे आमिष दाखवत अनेकांना कोट्यावधी ऊपयांना गंडा घालणाऱ्या एका सराईत रेकॉर्डवरील ठगाला सर जे. जे मार्ग पोलिसांनी अटक केली. आबीद युसूफ अन्सारी (51) असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या बारा वर्षांपासून फरार होता.

Advertisement

त्यांच्याविऊद्ध मुंबईसह महाराष्ट्र आणि इतर राज्यात अठरा ते वीसहून अधिक फसवणुकीच्या गुह्यांची नोंद आहे. फसवणुकीच्या याच गुह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुऊ आहे. या चौकशीतून फसवणुकीच्या इतर काही गुह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील तक्रारदार विष्णू रत्न गुडेकर यांच्या मुलीला एमबीबीएससाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुऊ होते.

याच प्रयत्नात असताना त्यांची आबीद अन्सारीशी ओळख झाली होती. त्याने त्यांच्या मुलीला एमबीबीएस शिक्षणासाठी ठाण्यातील कळवा येथील राजीव गांधी मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून टप्याटप्याने 42 लाख ऊपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांच्या मुलीला प्रवेश दिला नाही. तिला प्रवेश मिळाल्याचे बोगस दस्तावेज दिले होते, मात्र त्याची शहानिशा केल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे संबंधित दस्तावेज बोगस असल्याचे उघडकीस आले होते.

Advertisement

याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्याने एमबीबीएस प्रवेशासाठी दिलेल्या 42 लाखांची मागणी सुऊ केली होती. मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही. काही दिवसांनी तो पळून गेला होता. या प्रकारानंतर त्यांनी सर जे. जे मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर कऊन पैशांचा अपहार कऊन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख, पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक् प्रशांत नेकर, पोलीस हवालदार तडवी, घाडगे, पोलीस शिपाई शेवरे, चौधरी, पठाण व तांत्रिक मदत पोलीस सचिन पाटील यांनी आरोपीचा शोध सुऊ केला होता. तपासात आबीदने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते.

फसवणुकीनंतर तो गेल्या बारा वर्षांपासून फरार होता. त्यामुळे त्याची माहिती काढण्याचे काम सुऊ असताना तो आग्रीपाडा येथील एका अपार्टमेंटमध्ये लपला असल्याची माहिती पोलिसांना समजले होते. या माहितीनंतर या पथकाने त्याला आग्रीपाडा येथून अटक केली.

तपासात आबीद हा फसवणुकीच्या गुह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविऊद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात तीन, महाराष्ट्रात पाच, गुजरात चार, उत्तराखंड एक, दिल्ली तीन आणि मध्यप्रदेशात दोन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. त्याच्याविऊद्ध जळगाव कोर्टाने जाहीरनामा जारी कऊन वॉण्टेड आरोपी म्हणून घोषित केले होते. याच गुह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आबीदने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.