For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई कोस्टल रोडवर भरधाव कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक जण गंभीर

03:56 PM Sep 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबई कोस्टल रोडवर भरधाव कारचा भीषण अपघात  तिघांचा मृत्यू  एक जण गंभीर
Advertisement

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भरधाव बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. लोटस जेट्टीजवळ, लाला लजपतराय महाविद्यालयासमोर पहाटे सुमारे 5.20 वाजता हा अपघात झाला.

Advertisement

प्राथमिक माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जात होती. भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्याला धडक देत पुलावरून खाली कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. कार खाली सुरू असलेल्या पार्किंगच्या कामाच्या ठिकाणी कोसळली.

अपघातानंतर कारमधील चारही जणांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर एक जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. मृतांमध्ये 21 वर्षीय शानय गज्जल आणि 17 वर्षीय धिर्या सेठ यांचा समावेश असल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. तिसऱ्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.

Advertisement

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू असून वाहनाचा वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटण्यामागील कारणांचा तपास केला जात आहे.

Advertisement
Tags :

.