मुंबई-छत्तीसगड रणजी लढत अनिर्णीत
वृत्तसंस्था / मुंबई
यजमान मुंबई आणि छत्तीसगड यांच्यातील इलाईट ड गटातील रणजी सामना मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णीत राहिला. या सामन्यात मुंबई संघातील अजिंक्य रहाणेनेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 416 धावा जमविल्या. अजिंक्य रहाणेने दीड शतक (159), सिद्धेश लाड 80 तर मुलानीने 39 व कर्णधार ठाकुरने 29 धावा जमविल्या. छत्तीसगडच्या आदित्य सरवटेने 5 तर रवीकिरणने 3 गडी बाद केले. त्यानंतर छत्तीसगडचापहिला डाव 217 धावांत आटोपला. मुंबईने छत्तीसगडवर पहिल्या डावात 199 धावांची आघाडी मिळविली. छत्तीसगडच्या डावात सलामीच्या आयुष पांडेने 50 तर अशुतोष सिंगने 43, शशांक सिंगने 33 धावा केल्या. मुंबईच्या मुलानीने 59 धावांत 5 तर हिमांश सिंगने 42 धावांत 3, मुशीर खानने 2 गडी बाद केले. मुंबईकडून छत्तीसगडला फॉलोऑन स्वीकारावा लागला. छत्तीसगडने दिवसअखेर दुसऱ्या डावात 3 बाद 201 धावा जमवित हा सामना अनिर्णीत राखला. छत्तीसगडचा सलामीचा फलंदाजी आयुष पांडेने 171 चेंडूत 1 षटकार आणि 17 चौकारांसह 117 धावा जमविल्या. संक्षिप्त धावफलक: मुंबई प. डाव 416, छत्तीसगड प. डाव 217, छत्तीसगड दु. डाव 3 बाद 201 (आयुष पांडे 118).