महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबई झाले राममय

06:42 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सगळे हिंदू भाजपा समर्थक नाहीत. मात्र सगळे हिंदू हे रामाचे भक्त आहेत. श्रीराम हे प्रत्येकाच्या आस्थेचा मानबिंदू आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रत्येक मुंबईकराने राजकीय अभिनिवेष बाजूला साऊन स्वागत केले. हेच आजच्या मुंबईतील राममय वातावरणातून दिसून आले.... मात्र हा कुणा एकाचाच विजय असल्याचे किंचितही मानू नये...!

Advertisement

कोणत्याही वर्षाच्या दिवाळी सणाला लाजवेल असे सध्या मुंबईतील वातावरण आहे. निमित्त आहे ते अयोध्येत साजऱ्या होणाऱ्या श्रीरामोत्सवाचे. सोमवारी 22 जानेवारी रोजी श्रीरामलल्ला राम मंदिरात विराजमान झाले. गेल्या काही दिवसापासून या रामोत्सवाच्या जल्लोषाची उत्कंठा अवघ्या मुंबईकरांना लागली होती. ती आज भगव्या कपड्यांमधून, गल्लीबोळातील पताकांमधून, सोहळा दिसावा यासाठी उभारण्यात आलेल्या चौकाचौकातील एलईडीतून तसेच भगव्या पताकांमधून, रांगोळ्या आणि आकाश कंदीलातून, मंदिरातील घंटानादासह केल्या जाणाऱ्या मंत्रघोषातून दिसून आली. अयोध्येतील रामोत्सवाच्या वातावरणाशी स्पर्धा  करेल असे मुंबई आणि उपनगर आणि एमएमआरए रिजनमध्ये वातावरण राममय झाले आहे. हा उत्साह, जल्लोष रामभक्तांच्या कोंडलेल्या संघर्षमय मनातील असल्याचे दिसून आले. तसे पाहिल्यास शहरी नागरिक कोणत्याही धर्माच्या देवासमोर किंवा धार्मिक स्थळासमोर नतमस्तक होत असतात. मात्र गेले आठ दिवस सुऊ असलेला जल्लोष हा सांस्कृतिक मानबिंदूतून आल्याचे स्पष्ट होत आहे. आदिम कालापासून श्रीराम प्रत्येकाच्या मनामनात आहे. राम भारतीयांची संस्कृती आहे. श्रीराम अयोध्येचे असले तरी महाराष्ट्राशी त्यांचे असलेले नाते भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर भक्कम असे आहे. त्यामुळेच गदिमांनी रचलेल्या रामायणाचे पाठ रेडिओवर होत असताना घराघरात ते भक्ती भावाने ऐकले जात. असे श्रीराम विराजमान होत असताना मुंबईत उत्सव साजरा केला जात आहे. या शहरातील प्रत्येक घडामोडीत श्रीरामांचे स्मरण केले जात होते. नुकतीच मुंबईत टाटा मॅरेथॉन झाली. या मॅरेथॉनमध्ये श्रीराम नामाचा जप दिसून आला. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होतेच. या स्पर्धेत काही स्पर्धक भगवे कपडे घालून धावताना दिसले. तसेच काहींनी तर हातात शंख चक्रसारखी आयुधांची प्रतिऊपे घेतल्याचे दिसून आले. म्हणजे प्राणप्रतिष्ठा दिनाच्या फार पूर्वीपासूनच मुंबई शहर राममय झाले होते. अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त एकट्या मुंबईत चार हजार कोटी ऊपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर येत आहे. श्रीरामांना भावणाऱ्या रंगापासून ते कपडे फुले एलईडी अशा बऱ्याच वस्तूंमधून ही उलाढाल झाल्याचे दिसून आले. गेल्या आठ दिवसांपासून भगवे झेंडे, पताका, पारंपारिक वेष, कुडते-पायजमे अशा पारंपारिक वस्तू आणि कपड्यांमधून ही उलाढाल झाली. यात सर्वाधिक मागणी स्वागत तोरण तसेच श्रीरामांची छबी असलेल्या तोरणांना आणि भगव्या पताकांना होती. गेल्या काही दिवसांपासून कपडा बाजार तेजीत असल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले. तसेच मुंबईतील मोठ्या रस्त्यांपासून ते चौकांमधून तसेच नाक्यांवर देखील श्रीरामांचे मोठाले कट आऊट लावून शुभेच्छा देण्यात आल्याचे दिसून आले. त्याचवेळी श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीच्या बॅनर आणि बोर्ड झळकल्याचे दिसले. त्यामुळे प्रिंटींग क्षेत्रातही मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाणाऱ्या रामभक्तांनी मिळेल तो वाहतूक पर्याय निवडला. यात हवाई मार्गापासून ते रस्ते मार्गावरील तिकिटे महागल्याचे समोर आले. यात विमान वाहतूक मार्गात सर्वाधिक महागाई झाल्याचे दिसले. यापूर्वी मुंबई ते अयोध्या हा प्रवास 4 हजार ऊपयांच्या घरात केला जात असे. मात्र श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा दिवसाचा मुहुर्त साधण्यासाठी गेलेल्या रामभक्तांनी 10 हजार प्रति व्यक्ती मोजून अयोध्या गाठल्याचे सांगितले. शिवाय याच काळात इंडिगो एअरलाईन्सची तिकिटे सोमवारी साडे अकरा हजारांवर पोहचल्याचे सांगण्यात आले. हे दर फेब्रुवारी पर्यंत कायम राहतील असा अंदाज आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रभू श्रीरामाच्या छबीच्या चांदीची नाणी खरेदी केली जात होती. विशेषत: 22 जानेवारी रोजी हे नाणे खरेदी करून त्याची देव्हाऱ्यात स्थापना करण्याची लगबग अधिक होती. त्यामुळे चांदी-सोने बाजारात देखील तेजी असल्याचे दिसून आले. चांदी-सोने बाजारात देखील कोटीची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मुंबईतील चौका चौकात प्राणप्रतिष्ठा पाहण्यासाठी एलईडी स्क्रिन ठेवल्याचे दिसून आले. एरवीच्या दिवसात या एलईडी स्क्रिनचे भाडे दहा हजार ऊपये असते. मात्र सोमवारच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुहुर्तावर 25 ते 30 हजाराच्या घरात होते. तरी काही वस्त्यांमधील मुंबईकरांची एलईडी स्क्रिनवर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्याची ईच्छा अतृप्तच राहिली. मुंबई शहर आणि उपनगरे यांसह एमएमआरए रिजनमध्ये राममय वातावरण करण्याचे काम संघाकडून करण्यात आले. हजारो स्वयंसेवक रात्रंदिन यासाठी झटत होते. त्यांना सहकार्य रामभक्त मुंबईकरांनी केले. शिवाय भाजपाचे कार्यकर्ते देखील होतेच. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा मंगलमय सोहळ्याचे अक्षतऊपी आमंत्रण प्रत्येक मुंबईकराला घराघरात कसे जाईल यांची तजवीज करण्यात आली होती. पूर्व उपनगरात राममंदिर अक्षता वाटप करण्यासाठी वस्त्यांमध्ये गट तयार करण्यात आले होते. गट वस्त्यांमधील लोकसंख्येवर अवलंबून होते. 1989 सालात जे स्वप्न पाहिले ते स्वप्न 2024 मध्ये पूर्ण झाल्याची भावना विक्रोळी विधानसभेचे भाजपाचे उपाध्यक्ष राघव पै यांनी व्यक्त केली. तर भाजपा आणि संघाच्या व्यतिरिक्त कार्यकर्ते देखील अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेसाठी झटत होते. सुमारे महिन्याभरापूर्वी पासून 16 हजार पत्रिका छापल्या. या पत्रिका प्रत्येक घरी वाटण्यात आल्या. या सोहळ्यात सर्व समाजातील लोकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे पवई हिंदू एकता सकल समाजाचे अध्यक्ष भारत सिंह यांनी सांगितले. ही स्थिती एका परिसरातील असून मुंबई शहर आणि उपनगर परिसर आणि एमएमआरए रिजनसाठी संघाकडून नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे संघाकडून निमंत्रण अक्षता आणि पत्रिका वाटपाचे कार्य नियोजनबद्ध करण्यात आले. यासाठी वस्त्यांची गणना कऊन त्यांवर वस्ती संपर्क प्रमुख नेमण्यात आले. असे 18 हजार वस्ती संपर्क प्रमुख नेमण्यात आले होते. दरम्यान भाजपावर रामोत्सवाचा इव्हेंट केला जात असल्याचा आरोप केला जात असताना प्रत्येक मुंबईकराने मात्र रामोत्सवाचा आनंद हृदयातून लुटला. हा प्रत्येक मुंबईकर भाजपाई किंवा संघवाला असेलच असे नाही. मात्र भाजपा आणि संघासोबत हा क्षण साजरा केल्याची खुणगाठ बिगर भाजपाई मुंबईकराने नक्कीच मारली असेल. असे असताना हा मोठा विजय असल्याचे कोणत्याही एका राजकीय पक्षाने किंचितही मानू नये. कारण प्रभूराम प्रत्येक भारतीयाचे दैवत आहेत.

Advertisement

राम खांदारे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article