कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुंबईचा विदर्भवर 7 गड्यांनी विजय

06:33 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्ली, उत्तराखंड, रेल्वे, आंध्र विजयी

Advertisement

वृत्तसंस्था / लखनौ

Advertisement

सय्यद मुस्ताकअली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी इलाईट अ गटातील येथे झालेल्या सामन्यात आयुष म्हात्रेच्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबई संघाने विदर्भचा 7 गड्यांनी पराभव केला. तर या स्पर्धेतील अन्य सामन्यात रेल्वेने केरळचा तर आंध्रने ओडिशाचा, दिल्लीने तामिळनाडूचा पराभव केला. अ गटातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भने 20 षटकांत 9 बाद 192 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबईने 17.5 षटकांत 3 बाद 194 धावा जमवित विजय नेंदविला.

अथर्व तायडे आणि अमन मोखाडे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर विदर्भने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली. अथर्व तायडेने 36 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 64 तर अमन मोखाडेने 30 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 61 धावा झोडपल्या. मुंबईतर्फे शिवम दुबे तसेच साईराज पाटील यांनी प्रत्येकी 3 तर अथर्व अंकोलेकरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईच्या डावात 18 वर्षीय आयुष म्हात्रेने 53 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 110 धावा झोडपल्या. टी-20 प्रकारातील म्हात्रेचे हे पहिले शतक आहे. मुंबईच्या डावाला सुरूवात झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात दर्शन नलकांडेने अजिंक्य रहाणेला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. त्यानंतर हार्दीक तेमोरे केवळ एका धावेवर बाद झाला. मुंबईची स्थिती यावेळी 2 बाद 21 अशी होती. सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 35 धावा जमविताना म्हात्रे समवेत तिसऱ्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. हर्ष दुबेने 19 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 39 धावा जमविताना म्हात्रे समवेत 35 चेंडूत 85 धावांची भागिदारी केली.

या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात रेल्वेने केरळचा 35 धावांनी पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने 20 षटकात 7 बाद 149 धावा जमविल्या. त्यानंतर केरळने 20 षटकांत 8 बाद 117 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. अन्य एका सामन्यात आंध्रप्रदेशने ओडिशाचा 66 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आंध्रने 20 षटकांत 7 बाद 184 धावा जमविल्या. त्यानंतर ओडिशाचा डाव 17.2 षटकांत 118 धावांत आटोपला.

दिल्लीचा विजय, यश धूलचे शतक

अहमदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेतील एका सामन्यात यश धूलच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने तामिळनाडूवर शेवटच्या चेंडूवर सहा गड्यांनी विजय मिळविला. ड गटातील झालेल्या या सामन्यात तामिळनाडूने 20 षटकांत 7 बाद 198 धावा केल्या. तुषार रहेजाने 72 तर सात्विकने 54 धावा जमविल्या. दिल्लीतर्फे प्रिन्स यादवने 3 गडी बाद केले. त्यानंतर दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 203 धावा जमवित विजय नोंदविला. यश धूलने 46 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 71, आर्याने 15 चेंडूत 35, नितीश राणाने 26 चेंडूत 34 तर आयुष बडोणीने 23 चेंडूत 41 धावा झोडपल्या.

त्रिपुरामध्ये झालेल्या या स्पर्धेतील सामन्यात राजस्थानने त्रिपुराचा 5 गड्यांनी पराभव केला. त्रिपुराने 20 षटकांत 7 बाद 169 धावा केल्यानंतर राजस्थानने 18.5 षटकांत 5 बाद 171 धावा जमवित विजय नोंदविला. राजस्थानला या सामन्यात चार गुण मिळाले. अन्य एका सामन्यात उत्तराखंडने सौराष्ट्राचा 6 गड्यांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्रने 20 षटकांत 7 बाद 183 धावा केल्या. त्यानंतर उत्तराखंडने 18.1 षटकांत 4 बाद 184 धावा जमवित विजय मिळविला. उत्तराखंडला या सामन्यात 4 गुण मिळाले.

संक्षिप्त धावफलक: विदर्भ 20 षटकांत 9 बाद 192, मुंबई 17.5 षटकांत 3 बाद 194 (आयुष म्हात्रे नाबाद 110, सूर्यकुमार यादव 35, शिवम दुबे नाबाद 39), रेल्वे 20 षटकांत 7 बाद 149, केरळ 20 षटकांत 8 बाद 117

-आंध्र 20 षटकांत 7 बाद 184, ओडिशा 17.2 षटकांत सर्वबाद 118,

-तामिळनाडू 20 षटकांत 7 बाद 198, दिल्ली 20 षटकांत 4 बाद 203 (यश धूल 71, आर्या 35, नितीश राणा 34, बडोनी 41),

-त्रिपुरा 20 षटकांत 7 बाद 169, राजस्थान 18.5 षटकांत 5 बाद 171

-सौराष्ट्र 20 षटकांत 7 बाद 183, उत्तराखंड 18.1 षटकांत 4 बाद 184.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article