For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mumbai | कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तालयाकडून मुंबईचे योगतज्ज्ञ डॉ. अजय रवींद्र कुंभार यांचा विशेष सन्मान

11:38 AM Mar 10, 2026 IST | NEETA POTDAR
mumbai   कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तालयाकडून मुंबईचे योगतज्ज्ञ डॉ  अजय रवींद्र कुंभार यांचा विशेष सन्मान
Advertisement

                    योग प्रसारासाठी डॉ. अजय कुंभार यांना कोलंबो येथे विशेष सन्मान

Advertisement

मुंबई - योग आणि सर्वांगीण आरोग्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारे मुंबई येथील योगतज्ज्ञ डॉ. अजय रवींद्र कुंभार यांना श्रीलंकेतील कोलंबो येथे असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयाकडून विशेष गौरव करण्यात आला आहे. भारतीय उच्चायुक्तालयाच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राच्या (SVCC) वतीने त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना अधिकृत प्रशंसा पत्र प्रदान करण्यात आले.

डॉ. कुंभार गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेतील भारतीय सांस्कृतिक केंद्राशी संलग्न राहून तेथील नागरिकांना नियमितपणे ऑनलाईन योग प्रशिक्षण देत आहेत. २०२० पासून सुरू झालेल्या या उपक्रमातून शेकडो साधकांना योग, प्राणायाम आणि ध्यान यांचे मार्गदर्शन मिळत आहे. कोविड काळात सुरू झालेला हा उपक्रम आजही निरंतरपणे सुरू असून, भारतीय योगपरंपरेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करत आहेत.

Advertisement

स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राने डॉ. कुंभार यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सर्वांगीण आरोग्याच्या प्रसारासाठी असलेल्या त्यांच्या समर्पणाची विशेष दखल घेतली आहे.मुंबईतील शैक्षणिक व योग क्षेत्रातील आपला अनुभव वापरून त्यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी योगदान दिले आहे. डॉ. कुंभार यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे योग क्षेत्रातून तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Advertisement
Tags :

.