For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानविरुद्ध पुनरागमनाचे मुंबईसमोर लक्ष्य

06:55 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानविरुद्ध पुनरागमनाचे मुंबईसमोर लक्ष्य
Advertisement

हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची आशा, दिल्लीकडून झालेल्या पराभवातून सावरण्याचे प्रयत्न 

Advertisement

वृत्तसंस्था  / गुवाहाटी :

आज मंगळवारी गुवाहाटी येथे होणाऱ्या आयपीएल सामन्यात आत्मविश्वास वाढलेल्या राजस्थान रॉयल्स संघाविऊद्ध खेळताना मुंबई इंडियन्सला कर्णधार हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुऊस्त होण्याची आशा असेल. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघ हंगामाच्या सुऊवातीची आपली विजयी लय कायम ठेवण्यास उत्सुक असेल.

Advertisement

संघातील एक प्रमुख खेळाडू असलेला पांड्या आजारपणामुळे मुंबई इंडियन्सच्या मागील सामन्यात खेळू शकला नाही आणि शनिवारी दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या सहा गडी राखून पराभवात त्याची अनुपस्थिती निर्णायक ठरली. भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या जागी नेतृत्व करताना सातत्य राखले असले, तरी मुंबई इंडियन्सला पांड्याच्या अष्टपैलू क्षमतेची उणीव जाणवली. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघरचनेतही बदल करावा लागला. त्या सामन्यासाठी संघात आलेल्या दीपक चहरने प्रभावी गोलंदाजी केली, परंतु अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या जागी वेगवान अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉशला संघात घेण्याचा निर्णय फसला आणि या दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाने धावा दिल्या.

पांड्या तेव्हापासून संघासोबत प्रवास करून जाळ्यात सरावासाठी परतला आहे, ज्यामुळे त्याच्या पुनरागमनाची आशा निर्माण झाली आहे, कारण वरील पराभवानंतर मुंबई इंडियन्स आपला दृष्टिकोन नव्याने आखू पाहत आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणारा शार्दुल ठाकूर मागच्या सामन्यात महागडा ठरला, तर नेहमीच भरववशाचा असलेला जसप्रीत बुमराह किफायतशीर गोलंदाजी करत आहे, पण या हंगामात त्याने अजून खाते उघडायचे आहे. फिरकी गोलंदाजी विभागात मिचेल सँटनरने अफगाण फिरकीपटू अल्लाह गझनफरच्या जागी आपली निवड योग्य ठरवली आहे आणि तो आपले स्थान कायम ठेवण्याची शक्यता आहे.

मात्र, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थानच्या आघाडीच्या फळीविऊद्ध आपला खेळ उंचावावा लागेल. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि युवा सनसनाटी खेळाडू वैभव सूर्यवंशी यांनी त्यांना स्फोटक सुऊवात करून दिली आहे आणि त्यानंतर ध्रुव जुरेलने तोच वेग कायम ठेवलेला आहे..  नवीन कर्णधार रियान परागला फलंदाजात अद्याप लक्षणीय योगदान देता आलेले नाही, परंतु त्याच्या नेतृत्वामुळे, विशेषत: अखेरच्या षटकांमध्ये घेतलेल्या रणनीतिक निर्णयांमुळे रॉयल्सला गुजरात टायटन्सवर रोमांचक विजय मिळविण्यास मदत झाली. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

संघ-राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फेरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, अमन पेराला, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, सॅम करन, अॅडम मिल्ने, ब्रिजेश शर्मा, जोफ्रा आर्चर, कुलदीप सेन, क्वेना मफाका, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई आणि संदीप शर्मा.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शेरफेन रदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अथर्व अंकोलेकर, राज बावा, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स, मयंक रावत, नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तिलक वर्मा, अश्वनी कुमार, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, ए. एम. गझनफर, मयंक मार्कंडे, मोहम्मद इझहार, रघू शर्मा.

वेळ : सायं. 7.30 वा.

Advertisement
Tags :

.