For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूर्ण शरीरात करविल्या अनेक शस्त्रक्रिया

06:46 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पूर्ण शरीरात करविल्या अनेक शस्त्रक्रिया
Advertisement

बार्बी होत जमविले 10 लाख चाहते

Advertisement

महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक प्लास्टिक सर्जरी करवून घेत असतात. जगात अनेक महिलांनी कित्येक शस्त्रक्रिया करवून घेत स्वत:ला बार्बी डॉलमध्ये बदलले आहे. अशाच महिलांपैकी एक आहे  इराकच्या बगदाद येथे राहणारी 30 वर्षीय डालिया नाईम.

डालियाने बार्बी गर्लसारखे दिसण्यासाठी तब्ब्बल 43 प्लास्टिक सर्जरी करवून घेत जगाचे लक्ष वेधून घेतले होते. डालियाला जगभरात अनेक चाहते मिळाले, परंतु अनेक लोकांना तिचा हा बदल पसंत पडलेला नाही. काही लोक तिला झोम्बी संबोधितात, तर काही जण तिला डेविल बार्बी म्हणतात.

Advertisement

एक वर्षापूर्वी बार्बी गर्ल झालेली डालिया नईम पूर्णपणे एका डॉलप्रमाणे दिसते आणि आता इन्स्टाग्रामवर तिचे 9,95,000 फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती अत्यंत सक्रीय असून वेळोवेळी पोस्ट अपलोड करत असते. परंतु प्रत्येक जण ती डॉलसारखी दिसत असल्याचे मानत नाही.

डालिया मागील वर्षीच सोशल मीडिया स्टार झाली होती, परंतु अनेक लोक तिला नापसंत करतात आणि तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. काही जणांनी तर डालियाला देवाच्या मदतीची गरज असल्याचे म्हटले आहे. डालियाने आतापर्यंत स्वत:च्या शरीरावर 43 शस्त्रक्रिया करवून घेतल्या आहेत. तिच्याकडे पाहिल्यावर आपण जणू बाहुलीच पाहत आहोत असे वाटू लागते.

डालियाच्या चाहत्यांची संख्या कमी नाही हे निश्चित. परंतु तिला ट्रोल करणारे देखील कमी नाहीत. तिचा बाहुलीसारखा लुक अनेकांना पचनी पडत नाही. तिला कुणी झोम्बी म्हणते तर काही जण तिला डेविल बार्बी असे संबोधित असतात.

डालिया इराकच्या अनेक टीव्ही शोंमध्ये दिसून येते आणि तेथे तिला मोठी पसंतीही मिळते. तिच्या मुलाखती घेतल्या जातात आणि ती बार्बीप्रमाणे दिसते असे नाही तर ती बार्बीच्या जगातच राहत असल्याचे बोलले जाते.

Advertisement
Tags :

.