दिल्लीत बहुमजली इमारत कोसळली
06:05 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
दिल्लीच्या साकेत परिसरात शनिवारी रात्री एक पाच मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याच्या शक्यतेने तातडीने मदत व बचावकार्य राबविण्यात आले. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, त्यांना रात्री 7:45 वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी चार अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या. तसेच एसडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आले. रात्री 10 वाजेपर्यंत चार जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. स्थानिक प्रशासन, दिल्ली पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथक बचावकार्यात सहभागी झाले होते. बचाव पथकांकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी परिसरातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.
Advertisement
Advertisement