महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

मुकेश अंबानी यांनी दुबईत घेतली सर्वात महागडी हवेली; ही आहे किंमत

10:05 PM Oct 19, 2022 IST | Abhijeet Khandekar

मुंबई : रिलायन्स ( Reliance) इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी ( mukesh Ambani ) यांनी दुबईच्या पाम जुमेराह बेटावर ( Palm Jumairah land) तब्बल 163 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 1349.60 कोटी रुपयांचा एक भव्य वाडा खरेदी केला आहे. अंबानी यांनी गेल्या आठवड्यात कुवैतचे उद्योगपती मोहम्मद अलशाया यांच्या मालकीचा ही हवेली विकत घेतली. अंबानी हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती जवळजवळ 84 अब्ज डॉलर्स असून त्यांनी हा नवीन वाडा त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबनीसाठी (Anant Ambani ) खरेदी केली आहे.

Advertisement

अंबानी कुटुंबाने खरेदी केलेल्या या मालमत्तेत खाजगी स्पा, इनडोअर आणि आउटडोअर पूलसह दहा बेडरूमचे आलिशान निवासस्थान आहे. ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम (David Beckham) आणि बॉलिवुडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) यांसारखे स्टार अंबानींचे शेजारी होतील.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालक मुकेश अंबानी आपल्या परिवारासह दुबईत आपली उपस्थिती वाढवत असल्याचे दिसत आहे. गेल्याच वर्षी, रिलायन्सने 79 दशलक्ष डॉलर्स खर्च करून 'आयकॉनिक यूके कंट्री क्लब स्टोक पार्क' विकत घेतला आहे.

दुबई ( Dubai) हे जगातील प्रभावशाली व्यावसायिक, उद्योगपतींना आणि अधिकाऱ्यांना आपल्या मालमत्ता विकत घेण्याचे आमिष देत आहे. यूएईमध्ये असणाऱ्या विदेशी लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकसंख्या भारतीय आहे. ही लोकसंख्या यएई देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. तसेच दुबई रिअल इस्टेटच्या खरेदीदारांमध्ये सर्वाधिक भारतीय असल्याचे एका अहवालात दिसून आले आहे.

Advertisement
Tags :
JumeirahmansionMukesh Ambanitarunbharat
Advertisement
Next Article