राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेची मुहूर्तमेढ
13 व 14 रोजी मैदानाचे आयोजन
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेचा मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात रोवण्यात आली. बेळगाव कुस्तीगीर संघटनेच्या वतीने बेळगाव बाल केसरी, बेळगाव महिला केसरी, व बेळगाव केसरी किताब साठी बेळगावमध्ये पहिल्यांदाच मॅटवर आणि गुणावर आधारित लहान मुले व मुली, महिला व युवकांच्यासाठी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा शनिवारी दिनांक 13 व 14 रोजी पहिल्यांदाच बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. याची मुहूर्तमेढ रविवारी सकाळी हिंदवाडी आनंदवाडी आखाड्यात माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवठगीमठ्ठ, परशूराम नंदिहळ्ळी, राजेंद्र कलघटगी, अध्यक्ष मारूती घाडी बेळगाव केसरीचे किताबाचे पुरस्कर्ते डॉ गणपत पाटील यांच्या हस्ते आखाड्याचे पुजन करून मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आखाड्यात मंडप मैदानाचे सपाटीकरण महिला व पुरुष गटासाठी स्वतंत्र विभाग महिला, व प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था याचा आढावा घेण्यात आला व त्याची तयारी सुरू करण्यात आली,
यावेळी माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवठगीमठ्ठ यांनी बोलताना सांगितले बेळगाव येथे पहिल्यांदा होणाऱ्या राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बेळगाव, हल्याळ, धारवाड, दावणगिरी, बेळ्ळारी व राज्यातील इतर जिल्हातील महिला पैलवान पुरूष पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी बेळगाव शहर तालुका व जिल्हातील सर्व कुस्तीप्रेमी नागरीक महिला, बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. बेळगाव शहरात पहिल्यांदाच होणारी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ही विविध वजनी गटात आयोजित करण्यात आली आहे. बेळगाव तालुका मर्यादित मुला मुलींसाठी 20 किलो 28 किलो वजनी गट, तसेच खुल्या गटात पुरुष विभागात 32, 36, 44, 55, 63 किलो, 74 ते 84 किलो अशा विविध गटात होणार आहेत. व महिला कुस्ती पटूंसाठी 32, 36, 44, 52 व 60 ते 70 किलो वजनी गट जाहीर करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 13 रोजी सकाळी ठीक 8 ते 11 यावेळेत स्पर्धेच्या ठिकाणी वजन घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या स्पर्धकांनी जन्मदाखला आधारकार्ड शाळेचे बोनाफाईट सर्टिफिकेट बंधनकारक आहे. तसेच सर्व स्पर्धकांनी लाल व निळी जर्सी आणणे आवश्यक आहे. असे संघटनेने कळविले आहे. यावेळी कुस्ती संघटनेचे सर्व पदहधिकारी उपीस्थत होते.