For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज दुपारी होणार ‘मुहूर्त ट्रेडिंग’

06:22 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आज दुपारी होणार ‘मुहूर्त ट्रेडिंग’
Advertisement

यंदा वेळेत बदल : उद्या पाडव्यानिमित्त शेअरबाजार बंद राहणार

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

दिवाळीनिमित्त आयोजित केले जाणारे शेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग आज मंगळवार, 21 ऑक्टोबरला दुपारी 1.45 ते 2.45 वाजता होणार आहे. हे मुहूर्त ट्रेडिंग एक तास सुरु राहील. तत्पूर्वी 1.30 ते 1.45 वाजेपर्यंत प्री-ओपन सत्र सुरु राहणार आहे. या कालावधीत ट्रेडर्स ट्रेडिंगची तयारी करू शकतात. शेअर बाजाराला 22 ऑक्टोबरला बालिप्रतिपदा म्हणजेच पाडव्यानिमित्त सुटी राहणार आहे. मुहूर्त ट्रेडिंग हे गुंतवणूकदारांसाठी शुभ सत्र मानले जाते. गुंतवणूकदार या ट्रेडिंगकडे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समृद्धी आणि यश मिळवण्याची संधी म्हणून पाहतात. भारतीय शेअर बाजारात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र आयोजित केले जाते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएसईवर गेल्यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये मुहूर्त ट्रेडिंग सत्र सायंकाळी 6.00 वाजता आयोजित केले होते. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आज मंगळवारी एनएसई आणि बीएसईवर मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे मुहूर्त ट्रेडिंग नव्या वेळेत होणार आहे. यंदा 21 ऑक्टोबरला म्हणजेच आज दुपारी पावणेदोनला मुहूर्त ट्रेडिंग सुरु होऊन पावणेतीन वाजता बंद होईल. मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजतर्फे सर्वप्रथम 1957 मध्ये करण्यात आली होती

Advertisement

Advertisement
Tags :

.