Solapur Moharam 2026 | सोलापुरात मोहरमचा मोठा उत्साह; जिंदाबाद चौकात रंगला बडे इमाम-छोटे इमाम हुसेन यांच्या भेटीचा सोहळा!
06:59 PM Jun 26, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
सोलापुर-सोलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांतून पारंपरिक पंजा सवारी (ताबूत) मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवत मोहरमची परंपरा जपली.
Advertisement
याच निमित्ताने मुस्लिम बादशाह पेठ येथील जिंदाबाद चौक येथे बडे इमाम हुसेन छोटे इमाम हुसेन अर्थात तलवार पंजे यांची मिरवणुकांची भेट झाली. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. धार्मिक एकात्मता, शिस्त आणि पारंपरिक उत्साहाचे दर्शन घडवत मोहरमची मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. यावेळी अनेक नेते मंडळी जनसामान्या व भक्तगण मोठ्या संख्येत उपस्थित होते यामध्ये लक्षणे गोपाळांची संख्या लक्षणीय होती
Advertisement
Advertisement