For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुड्सशेड रोडवर चिखलाचे साम्राज्य

06:22 AM Oct 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
गुड्सशेड रोडवर चिखलाचे साम्राज्य
Advertisement

सततच्या खोदाईमुळे ठिकठिकाणी पडले खड्डे प्रवाशांना सहन करावा लागतोय मन:स्ताप

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुड्सशेड रोडची सध्या पूर्णत: वाताहत झाली आहे. रस्ता अनेक ठिकाणी खचला असून ये-जा करणेही अवघड झाले आहे. त्यातच मागील चार दिवसात झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल पसरला असून रेल्वे प्रवाशांनाही याचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

Advertisement

मराठा मंदिर कॉर्नरपासून रेल्वे ट्रॅकपर्यंतच्या गुड्सशेड रोडची दुरवस्था झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याखालून जलवाहिनी घालण्याचे काम करण्यात आले. चार-पाच महिने हे काम रखडले होते. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात माती व खडी टाकून रस्ता करून देण्यात आला होता. परंतु, त्यानंतर चांगल्या दर्जाचा रस्ता करण्यात आला नसल्याने येथे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनदेखील महानगरपालिकेसह इतर कोणत्याच विभागांनी लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.

काही दिवसांपूर्वी या परिसरात एका खासगी हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्या हॉस्पिटलने मान्यवरांच्या स्वागतासाठी खड्डेयांमध्ये खडी टाकली होती. परंतु, अवघ्या पंधरा दिवसात ती खडी उखडली आहे. या परिसरात हॉस्पिटल, रेल्वेस्थानक, हॉटेल, कार्यालये, शाळा तसेच रहिवासी वसाहती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु, रस्त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. ख•dयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात खडी अथवा मुरुम टाकला जात आहे. परंतु, आठ दिवसातच ती उखडली जात असल्याने या ठिकाणी चांगल्या दर्जाचा रस्ता करण्याची मागणी रहिवाशांमधून केली जात आहे.

Advertisement
Tags :

.