एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा समभाग चमकला
07:00 AM Oct 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : बीएसईवर गुरुवारी इंट्रा डे दरम्यान एमटीएआर टेक्नॉलॉजीचा समभाग 5 टक्के इतका वाढलेला दिसून आला. समभाग 5 टक्के इतकी वाढ नोंदवत 2473 रुपयांवर स्वार झालेला होता. सदरचा समभाग या भावासह दोन वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहचल्याचे दिसून आले. विमाने व संरक्षण क्षेत्रातील या कंपनीचा समभाग नोव्हेंबर 2023 नंतर सध्याला विक्रमी तेजीत दिसतो आहे. 11 सप्टेंबर 2023 ला या समभागाने 2920 रुपयांचा स्तर गाठला होता. ऑक्टोबरमध्ये हा समभाग 34 टक्के इतका दमदार वाढला आहे. 7 एप्रिल 2025 रोजी समभागाचा भाव 1152 रुपये इतका होता.
Advertisement
Advertisement