For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kokan News: चिपळुणातील बैठकीत महावितरण फैलावर, MLA Shekhar Nikam यांच्या सूचना

06:05 PM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
kokan news  चिपळुणातील बैठकीत महावितरण फैलावर  mla shekhar nikam यांच्या सूचना
Advertisement

व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत उदय ओतारी यांनीही निवेदन सादर केले

Advertisement

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून चिपळूण शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक व व्यापाऱ्याऱ्यांच्या तक्रारी तक्षात घेऊन आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने नगर पालिकेसमोरील काणे सभागृहात सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत व्यापाऱ्यांसह नागरिकांनी महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावर अखंडित वीज पुरवठ्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार शेखर निकम यांनी दिल्या. बैठकीच्या सुरुवातीला व्यापारी संघटनेचे सचिव उदय ओतारी यांनी बैठकीमागील उद्देश स्पष्ट केला.

Advertisement

माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी व्यापारी आणि नागरिकांच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. त्यानंतर रामदास राणे, सलीम पालोजी, योगेश बांडागळे, महेंद्र कासेकर, नाहुश चितळे, माजी नगरसेवक महंमद फकीर, कांता चिपळूणकर, उमेश काटकर, अदिती देशपांडे, रिहाना बिजले आदींनी महावितरणच्या कामकाजावर अनेक मुद्दे उपस्थित केले.

दूरध्वनी सातत्याने व्यस्त राहतो, नागरिकांना नीट उत्तरे दिली जात नाहीत, अशा तक्रारी व्यक्त झाल्या. व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत उदय ओतारी यांनीही निवेदन सादर केले. यावर महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी, शहरातील वीज पुरवठ्यावरील ताण, डीपी वाढवण्याची गरज, तसेच आवश्यक ते बदल यावर अभ्यास करुन व्यापाऱ्यांना
अखंडित वीज पुरवठा मिळेल, असे आश्वासन दिले.

मुरादपूर येथील उपकेंद्राची जागा बदलण्याबाबत आपण पाहणी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तक्रारीसाठी आणखी एक दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले, स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारींचे निरसन करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत मुख्याधिकारी विशाल भोसले यांनीही काही विषयांवर विवेचन केले.

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता संतोषकुमार कैरमकोंडा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापड़ी, उमेश काटकर, किशोर रेडीज, आशिष खातू सिद्धेश लाड यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुयारी गटार योजनेबाबत अहवाल तयार करा

महावितरण आणि नगर परिषद या दोन्हीही शासकीय संस्था आहेत. त्यांच्या परस्परांतील अडचणींचा त्रास नागरिकांना होता कामा नये. चिपळूण जुनी बाजारपेठ आहे. येथे अखंडित बीज पुरवठा व्हावा, यासाठी महावितरणने तातडीने पावले उचलावीत, असे आदेश आमदार शेखर निकम यांनी दिले.

भुयारी गटार योजना शहरासाठी उपयुक्त आहे की नाही याचा अहवाल तयार करा, नागरिकांसमोर तो सादर करा. योग्य असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जामंत्रीपद असून त्यांच्या माध्यमातून प्रस्ताव मंजूर करून निधी आणू, अशी ग्वाही दिली.

Advertisement
Tags :

.