For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महावितरणच्या वाफोली एबी स्विचला मध्यरात्री ठोकले टाळे

04:27 PM Aug 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
महावितरणच्या वाफोली एबी स्विचला मध्यरात्री ठोकले टाळे
Advertisement

ओटवणे दशक्रोशी १२ तास विजेविना

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

ओटवणे दशक्रोशी खंडीत विज पुरवठ्यामुळे आधीच हैराण झाली असताना शुक्रवारी मध्यरात्री कोनशी गावातील विजेमुळे त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने वाफोली गावातील महावितरणच्या एबी स्विचला मध्यरात्री टाळे ठोकल्यामुळे ओटवणे दशक्रोशी १२ तास विजेविना राहिली.या व्यक्तीने वीज वितरण कंपनीवर रोष आणि संताप व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास रातोरात वाफोली गावात जात एबी स्विचला टाळे केले. मात्र या एका व्यक्तीच्या महावितरणच्या विरोधातील या कृत्यामुळे ओटवणे दशक्रोशीला तब्बल १२ तास विजेविना अंधारात रहावे लागले. त्यामुळे ओटवणे दशक्रोशीतुन संताप व्यक्त होत आहे. या व्यक्ती विरोधात महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री यादव यांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र तत्पूर्वीच सदर व्यक्ती पोलीस स्टेशनला दाखल झाली. शनिवारी दुपारी बारा वाजता एबी स्विचला केलेले टाळे खोलण्यात आले. त्यानंतर ओटवणे दशक्रोशीचा वीज पुरवठा सुरळीत झाला.

Advertisement

Advertisement
Tags :

.