For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंथन परीक्षेत कु. वैभवी देवधर सावंतवाडी तालुक्यात प्रथम

05:05 PM Apr 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
मंथन परीक्षेत कु  वैभवी देवधर सावंतवाडी तालुक्यात प्रथम
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

ओटवणे करमळगाळू शाळा नं. ४ येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु. वैभवी वैजनाथ देवधर हिने मंथन परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत कु. वैभवी देवधर हिने १५० पैकी १२२ गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० क्रमांक तर राज्यात १५ वा क्रमांक पटकाविला. कु वैभवी देवधर हिच्या या दैदिप्यमान यशामुळे या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कु वैभवी देवधर हिला शाळेच्या शिक्षिका सौ. अणसुरकर आणि शिक्षक श्री ठाकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कु वैभवी देवधर हिचे माजगाव केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.