For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणित प्रज्ञा परीक्षेत कु.राजनंदिनी सावंत ,उर्वी आठलेकर यांना सुवर्णपदक

गणित प्रज्ञा परीक्षेत कु राजनंदिनी सावंत  उर्वी आठलेकर यांना सुवर्णपदक
Advertisement

राज्यात पहिल्या 50 मध्ये स्थान

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत सावंतवाडी शहरातील जि. प. शाळा नं. ४ मधील इयत्ता पाचवी मधील कु. राजनंदिनी चंद्रशेखर सावंत आणी कु. उर्वी दत्तात्रय आठलेकर या दोन विद्यार्थिनीनी राज्य गुणवत्ता यादीत पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवताना सुवर्णपदक पटकावले. तसेच या परीक्षेत या शाळेतील कु. अनुप्रिया अजित राणे व उर्वी अमितकुमार टकेकर या विद्यार्थिनींनी सिल्वर मेडल मिळवले.कु राजनंदिनी सावंत ही माजगाव हायस्कूलचे गणित शिक्षक चंद्रशेखर सावंत यांची मुलगी आहे. या परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक महेश पालव यांचे मार्गदर्शन लाभले. सुवर्णपदक प्राप्त या दोन्ही विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांनीही यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.