गश्मीरसोबत झळकणार मृण्मयी
‘एक राधा एक मीरा’ चित्रपट
अभिनेता गश्मीर महाजनी ‘फुलवंती’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. एक राधा एक मीरा या चित्रपटात ही नवी जोडी पाहता येणार आहे.
मृण्मयीने एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती गश्मीरसोबत दिसून येते. या व्हिडिओत ‘अंतरीचा सूर हलकेच असा उमटला..’ हे गाणे ऐकायला येत आहे. ‘एक राधा, त्याची अबोल प्रीत, एक मीरा त्याचे श्यामल गीत’ असे मृण्मयीने व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.
या चित्रपटात सुरभी भोसले, मेधा मांजरेकर, आरोह वेलणकर आणि संदीप पाठक हे कलाकारही दिसून येतील. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अविनाशकुमार प्रभाकर अहाले यांनी याची निर्मिती केली आहे. तर पटकथा किरण यज्ञोपवित यांनी लिहिली आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृण्मयी ही सध्या ‘मन फकिरा’, ‘मिस यू मिस्टर’, ‘फतेशिकस्त’, ‘नटसम्राट’, ‘शिकारी’, ‘फर्जंद’ अशा चित्रपटांमध्ये यापूर्वी दिसून आली आहे. अभिनयाबरोबरच मृण्मयी सोशल मीडियावर सक्रीय असते.