‘डकैत’मध्ये मृणाल ठाकूर
श्रुती हासनची घेतली जागा
डकैत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दोन पोस्टर्स जारी केली असून यातील एका पोस्टरमध्ये आदिवि शेष तर दुसऱ्या पोस्टरमध्ये मृणाल ठाकूर हातात बंदुक पकडून असल्याचे दिसून येते. हा चित्रपट दोन प्रेमींचा असून ज्यांना अनेक साहसी दरोड्यांसाठी पुन्हा एकजूट होण्यास भाग पाडले जात असल्याचे यात दाखविण्यात येणार आहे.
चित्रपटाची निर्मिती सुप्रिया यारलाग•ा यांनी केली असून हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत निर्माण केला जात आहे. याची कहाणी अन् पटकथा आदिवि शेष आणि शैनियल देव यांनी मिळून लिहिली आहे. चित्रपटाचे चित्रिकरण सध्या हैदराबाद येथे सुरू असून त्यानंतर महाराष्ट्रातही ते पार पडणार आहे.
चित्रपट डकैतमध्ये पूर्वी श्रुती हासनची नायिका म्हणून वर्णी लागली होती. परंतु आता श्रुतीची जागा मृणालने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हा चित्रपट एका क्रोधी गुन्हेगारावर आधारित असून तो माजी प्रेयसीकडून फसवणूक झाल्यावर तिचा सूड उगविण्याचा प्लॅन तयार करतो.
डकैत चित्रपटाची कहाणी खूपच वेगळी आहे. आदिवि आणि शॅनियल या दोघांनीही या कहाणीला वेगळे स्वरुप मिळवून दे आहे. या चित्रपटात मला अत्यंत आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ही भूमिका प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी अधिक प्रतीक्षा करू शकत नसल्याचे मृणालने म्हटले आहे.
डकैत हा मार्मिक प्रेमकहाणी असलेला दमदार अॅक्शन चित्रपट आहे. आम्ही या चित्रपटाच्या टीममध्ये मृणालचे स्वागत करताना रोमांचित झालो आहोत असे उद्गार आदिविने काढले आहेत.