एटलीच्या चित्रपटात मृणाल ठाकूर
अल्लु अर्जुनसोबत झळकणार
अभिनेत्री मृणाल ठाकूरला एटली आणि अल्लू अर्जुनचा चित्रपट मिळाला आहे. ती आता अल्लू अर्जुनची नायिका म्हणून झळकणार आहे. जवान आणि बेबी जॉन यासारखे चित्रपट देणारा एटली आता अल्लू अर्जुनसोबत चित्रपट निर्माण करत आहे. या चित्रपटात तीन नायिका असतील, मृणाल यापैकी एक असल्याचे समजते. चित्रपटात मृणालची अल्लू अर्जुनसोबत रोमँटिक जोडी दिसून येणार आहे. या चित्रपटात ती अत्यंत वेगळ्या लुकमध्ये दिसून येणार आहे. तर दीपिका पदूकोन आणि जान्हवी कपूरसोबत देखील या चित्रपटासाठी बोलणी सुरू आहेत. जान्हवीने होकार दिला आहे, तर दीपिकाचा होकार अद्याप आलेला नाही. दीपिकाने यापूर्वी एटलीसोबत जवान या चित्रपटात काम केले आहे. एटली आणि अल्लू अर्जुनच्या या चित्रपटात जबरदस्त व्हीएफएक्स असेल, तर चित्रपटात अल्लू अर्जुन दुहेरी भूमिकेत असणार आहे. चित्रपटासाठी लॉस एंजिलिस येथील स्पेशल इफेक्ट्स कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. या चित्रपटाचे बजेट 800 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. एटली आणि अल्लू ऑगस्ट महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहेत.