For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृणाल ठाकूरला मिळाली मोठी संधी

07:00 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृणाल ठाकूरला मिळाली मोठी संधी
Advertisement

रॉयल सेट आणि दमदार कहाणीसाठी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक रोमँटिक चित्रपट निर्माण करणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘तुम ही हो’ असणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत सिद्धांत चतुर्वेदी असणार आहे. त्याची नायिका म्हणून मृणाल ठाकूरची निवड करण्यात आली आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. ‘तुम ही हो’ हा चित्रपट रोमँटिक आणि म्युझिक ड्रामा धाटणीचा असेल. भन्साळी यांच्या या चित्रपटाची तयारी दीर्घकाळापासुन सुरू आहे. दिग्दर्शक रवि उद्यावर यांनी चित्रिकरणाच्या दिशेने पावले टाकली आहेत. चालू महिन्यात चित्रपटाची टीम उत्तराखंडमध्ये पोहोचणार आहे. तर पुढील शेड्यूलसाठी ऑक्टोबरमध्ये चित्रिकरण सुरू होईल. सिद्धांत चतुर्वेदी अलिकडेच युध्रा या चित्रपटात दिसून आला आहे. याचबरोबर तो ‘धडक 2’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत आहे. तर मृणाल ठाकूर ही ‘सन ऑफ सरदार’ या हिट चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये झळकणार आहे. तसेच ती डेव्हिड धवन यांच्या आगामी चित्रपटात वरुण धवनची नायिका म्हणून काम करणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.