For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ढाई आखर’मध्ये मृणाल कुलकर्णी

07:00 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ढाई आखर’मध्ये मृणाल कुलकर्णी
Advertisement

चित्रपटाला साहित्याशी जोडण्याचा अनोखा प्रयत्न

Advertisement

हिंदी चित्रपटांना हिंदीच्या साहित्याशी जोडण्याचा एक अनोखा प्रयत्न करणारा चित्रपट ‘ढाई आखर’च्या मर्मस्पर्शी ट्रेलरने लोकांची मने जिंकली आहेत. अमरीक सिंह दीप यांची कादंबरी ‘तीर्थाटन के बाद’वर आधारित या चित्रपटाचे संवाद असगर वजाहत यांनी लिहिले आहेत. स्तंभ गीतकार इरशाद कामिल यांनी या चित्रपटाला काव्यमय आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात प्रेमपत्राच्या काही अत्यंत सुंदर ओळींनी होते. या ट्रेलरमध्ये चित्रपटाची प्रेम आणि मानवी नात्यांच्या कहाणीला अत्यंत प्रभावीपणे दर्शविण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण अरोडा यांनी केले आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.   चित्रपटात हर्षिता नावाच्या अशा महिलेची कहाणी आहे, जी अनेक वर्षापर्यंत घरगुती हिंसा आणि अपमानास्पद वैवाहिक जीवनाची शिकार ठरली होती. ती पत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध लेखक श्रीधर यांच्या सहवासात येते, परंतु विधवा असल्याने तिचे हे नाते पुरुषप्रधान समाज स्वीकारत नसल्याचे यात दाखविण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी यात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेमावरून समाजाची दुटप्पी भूमिका दर्शवत असल्याचे मृणाल यांनी म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.