For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यावरील अन्याय रोखण्यास मृणाल समर्थ

11:01 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यावरील अन्याय रोखण्यास मृणाल समर्थ
Advertisement

आमदार चन्नराज हट्टीहोळी यांचे प्रतिपादन : अनगोळ परिसरात प्रचार

Advertisement

बेळगाव : मृणाल हेब्बाळकर एक उत्साही व्यक्तिमत्त्व आहे. मतदारसंघामध्ये प्रचारादरम्यान प्रत्येक गावात उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यावर होणारा अन्याय रोखण्याचे सामर्थ्य मृणालमध्ये आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. बेळगाव दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या अनगोळ येथे लोकसभा काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले, उमेदवार मृणाल हेब्बाळकर उच्चशिक्षित असून त्यांची लोकसभेवर निवड झाल्यास मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार आहे. या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट केला जाईल आणि ते त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे, असे त्यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये मृणाल हेब्बाळकर प्रचारामध्ये आघाडीवर आहेत. भाजप उमेदवाराबाबत पक्षामध्येच मतभिन्नता आहे. अनेकजण नाराज आहेत. त्यामुळे मृणाल यांच्या विजयाची वाट सोपी झाली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी मृणाल हेब्बाळकरांना भरघोस पाठिंबा देऊन विजयी करा, असे आवाहन आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.